ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महिला कुस्ती पट्टूंच्या थरारक डावपेचांनी ब्रह्मपुरीकर मंत्रमुग्ध

प्रेक्षकांची अलोट गर्दी - दुसऱ्या दिवशी रंगला 224 लढतींचा महासंग्राम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

ब्रम्हपुरी :- राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसाच्या शुभ पर्वावर विजय वडेट्टीवार मित्र परिवार ब्रह्मपुरी व तालुका कुस्तीगीर संघ ब्रह्मपुरी यांचे संयुक्त विद्यमाने ब्रह्मपुरी येथे दुसरी किताब महाराष्ट्र केसरी महिला कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचा दर्शनीय उद्घाटन सोहळा काल थाटात पार पडला. यात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून 600 हून महिला कुस्तीपटूंनी विद्यानगरी ब्रह्मपुरी गाठत आयोजित महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सहभाग नोंदविला. तीन दिवसीय आयोजित स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी एकूण 224 महासंग्राम चांगलाच रंगला. यात सहभागी स्पर्धकांनी आपला अनुभव व संपूर्ण ताकदीनिशी सामन्यात रंगत आणली. कुस्तीपटूंच्या विविध डावपेचांचा थरार उपस्थित दर्शकांनी अनुभवला. व ब्रह्मपुरीकर नागरिक मंत्रमुग्ध झाले.

आज सकाळपासूनच आयोजकांमार्फत नियोजित वेळापत्रकानुसार कुस्ती सामन्यांच्या लढती वयोगटांनुसार घेण्यात आल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये