ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चिमूर क्रांती जिल्हा घोषीत करा – अतिरिक्त जिल्हाधिकारी मार्फत निवेदन

मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,महसुल मंत्र्यांना मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. रोहन नन्नावरे

            देशाच्या स्वांतत्र्य लढ्यात चिमूर स्वांतत्र्य संग्राम १९४२ चे अमुल्य योगदान आहे.यात अनेक क्रांती विरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली तर अनेकांनी तुरुंगवास भोगला.गेली अनेक वर्षा पासुन चिमूर क्रांती जिल्ह्याची न्याय मागणी केल्या जात आहे.त्यामुळे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात जिल्ह्याची घोषणा करावी अशा मागणीचे निवेदन ६ डिसेंबर रोज बुधवारला उप विभागीय अधिकार्‍या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,तथा महसुल मंत्र्यांना देण्यात आले.

          चिमुर या शहरापासुन चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदीया, वर्धा, यवतमाळ या प्रत्येक जिल्हयाचे अंतर १०० कि. मी. च्या वर असुन चिमुर हे शहर मध्य ठिकाणी उमा नदीच्या तिरावर वसलेले आहे.चिमुर जिल्हयाची मागणी मागील ४० वर्षापासुन होत असुन प्रशासकीय यंत्रणेव्दारे झालेल्या सव्र्व्हेनुसार चिमुर जिल्हयाचे नाव जिल्हा होण्यासाठी नविन जिल्हयाची यादीत समाविष्ठ आहे. जर चिमुर जिल्हयाची निर्मिती झाली तर येथे शासकीय कार्यालयासाठी मुबलक जागा उपलब्ध आहे.हिवाळी अधिवेशनात चिमुर जिल्हयाची विशेष बाब म्हणुन घोषणा करावी.हिच शहीदांना खरी श्रध्दांजली ठरेल.अशा मागणीचे निवेदन उप विभागीय अधिकारी किशोर घाडगे यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री तथा महसुल मंत्र्यांना देण्यात आले.निवेदन देताना केशवराव वरखेडे,प्रा.संजय पिठाडे, सुभाष शेषकर, श्रीहरी सातपुते. रामदास कामडी. रामभाऊ खडसिंगे. दांडेकर. यांचे सह इतर नागरीक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये