ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शालेय राज्य स्पर्धा मध्ये वर्धा जिल्हा ज्युदो असोशिएशनचे खेळाडूचे सांगली येथे सुयश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

शालेय राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धा चे आयोजन सांगली येथे क्रीडा संकुल मध्ये दिनांक 21/12/2023 ते 23/12/2023 रोजी ज्युदो स्पर्धा आयोजित करण्यात आले होते त्या मध्ये वर्धा जिल्हा ज्युदो असोशिएशन मधील 14 वर्षा खालील यातील 1 ) भक्ती रविन्द्र दुरबुडे हीने 36 कीलो वजन गटात द्वितीय स्थान प्राप्त केले. 17 वर्षा खालील यातील 1) कुमारी ज्ञाणेश्वरी दिपक मेश्राम हीने 32 कीलो वजन गटात द्वितीय स्थान प्राप्त केले. 2) कुमारी मोनीका गेडेकर हीने 44 कीलो वजन गटात द्वितीय स्थान प्राप्त केले. 3) रुचिता रविन्द्रजी शेंडे हीने 57 कीलो वजन गटात तृतीय स्थान प्राप्त केले. 4) शोर्य भगत यांने 45 कीलो वजन गटात तृतीय स्थान प्राप्त केले. तसेच 19 वर्षा खालील 1) कुमारी मानसी रविन्द्र गाठे हीने 36 कीलो वजन गटात प्रथम स्थान प्राप्त केले. 2) कुमारी जागृती पवार हीने 40 कीलो वजन गटात तृतीय स्थान प्राप्त केले. 3) कुमारी दिशा काबंळे हीने 48 कीलो वजन गटात तृतीय स्थान प्राप्त केले. असुन कुमारी मानसी रविन्द्र गाठे हीचे राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धे करीता निवड झाली आहे. तसेच त्यांनी सांगली येथे जावुन वर्धा जिल्हयाचे नाव लौकीक केले आहे.

या यशाबद्दल वर्धा जिल्हा ज्युडो असोसिएशन चे प्रशिक्षक ओमप्रकाश पवार, चंद्रशेखर देशकर, जिवन कामडी, तिलक राणे, गौरव कामडी, अमोल बोडखे, दिपक मेश्राम, अतुल मदनकर, योगेश देवगीरकर, कुनाल शिंदे, साहील ठक, दुर्गेश सहारे, धनश्री गाठे, आपल्या आई-वडीलांना श्रेय दिले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये