ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कामगरांचे क्वाटर वाटपाच्या निषेधार्थ आयटक संघटनेचे आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच

आमरण उपोषणचे रूपांतर साकळी उपोषण झाले : आंदोलनात सहभागी झालेल्या आठ कामगारांच्या बदल्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

WCL व्यवस्थापनाने कामगार न्यायालयात केला अर्ज : कामगार आयुक्तांनी दोन्ही पक्षांना बोलावीले

तालुक्यातील वेकोलि माजरी परिसरातील कामगार क्वाटर क्र. A/189 च्या वाटपाचा प्रश्न आता गंभीर स्वरूप धारण करत असल्याचे दिसत आहे. चौथ्या दिवशीही या प्रकरणावर कोणताही तोडगा निघालेला नाही.दरम्यान, आयटक संघटना दुसऱ्या दिवसापासुन साकळी उपोषनात बदल केलेआहे. माजरी वेकोली व्यवस्थापन आणि आयटक संघटना (AYTC) यांच्यातील संघर्षाला पाठिंबा देणाऱ्या कामगारांना लक्ष्य करत व्यवस्थापनाने आठ कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणाहून इतर विभागात बदली केली आहे. त्यामुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून प्रशासना विरोधात नारेबाजी सुरु आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांना खूश करून माजरी परिसरातील किमान आठ ते दहा अधिकारी पंचवीस-पंचवीस वर्षांपासून एकाच विभागात अडकून पडले आहेत, नियमानुसार त्यांची बदली का होत नाही दिर्घकाळ सेवा केल्याने हे लोक त्यांच्या बदली का होत नाही . डब्ल्यूसीएलचे मुख्यालयही याकडे लक्ष देत नाही आणि सामान्य कर्मचारी जे संघटने चे पदाधिकारी आहे त्यांच्या बदली केली जाते, असा आरोप कामगार संघटना आयटक नेत केले आहे.

तिसऱ्या दिवशी सुरेश हेमके तर चौथ्या दिवशी रमेश गड्डाळ आंदोलनस्थळी महाव्यवस्थापक कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उपोषणाला बसले, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष दत्ता कोंबे व सचिव दीपक ढोके यांनी दिली आहे.

कामगार क्वाटर प्रकरणात मनमानी व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्यानंतर आणि वाटाघाटीतून हे प्रकरण निकाली निघत नसल्याचे पाहून माजरी वेकोलि व्यवस्थापनाने कामगार न्यायालय, चंद्रपूर येथे धाव घेतली व दोन्ही पक्षांना ईमेलद्वारे पत्र पाठवून न्यायालयाने समन्स बजावले. त्यांना बुधवारी, ११ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. आता सर्वांचे लक्ष कामगार न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये