Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

एनसीसी छात्र सैनिकांचे पथनाट्य ‘चला कचरापेटीचा वापर करू या’

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

देवळी : 21 महाराष्ट्र एनसीसी बटालियन अंतर्गत स्थानिक एस एस एन जे महाविद्यालयातील एनसीसी छात्र सैनिकांनी ‘राष्ट्रीय छात्र सेना स्थापना दिवस’ निमित्य देवळी शहरवासीयांना ‘कचरापेटीचा वापर करा व आपले शहर स्वच्छ ठेवा’ ही पथनाट्य मुख्य चौका-चौकात सादर करून ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ चा संदेश दिला.

एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी छात्र सैनिकांनी ‘ओला कचरा, सुका कचरा व घातक कचरा’ वेगवेगळा करून कचरापेटीत तो टाकावा, याकरिता शहरवासीयांना आवाहन केले. पथनाट्य सादर करणाऱ्या कलाकारांमध्ये सार्जंट कोमल शितळे, पायल चौके, मयुरी पेटकर, भूमिका कापसे, पूर्वा कापटे, मनोज नेहारे, समीक्षा नेवारे, साक्षी पारिसे, शितल अष्टकार, नयन तुमसरे, सौरभ साव, शुभम परिसे, कुंदन कावडे, रितेश सुरतकर, दुर्गेश पोटे व रितेश बुटे यांचा समावेश होता.

सदर पथनाट्याचे देवळी शहरवासी यांनी कौतुक केले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये