Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ठाणेदार अंभोरे यांनी ट्रॅव्हल्स चालकाचे मारहाण प्रकरण

ब्रम्हपुरीचे ठाणेदार वापरत असलेले खासगी वाहन वणी येथील जुगार, मटका किंगचे नावाने?

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

फिर्यादी ट्रॅव्हल चालकाच्या तक्रारीतील नमूद वाहन क्रमांकाचा उल्लेख

ब्रम्हपुरी – सध्या संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात चर्चेत असलेला ब्रम्हपुरी येथील ठाणेदार अंभोरे यांनी ट्रॅव्हल्स चालकाचे डोके फोडल्याचे प्रकरण गाजत आहे.ठाणेदार अंभोरे यांचे विरोधात ट्रॅव्हल्स चालक यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या तक्रारीत ठाणेदार ज्या वाहनात बसले होते ते वाहन क्रमांक MH-29-AR-8855 नंबरचा उल्लेख केला आहे ते वाहन यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील हाफिज रहेमान यांचे नावाने असून त्या व्यक्तीवर जुगार,मटका प्रकरणात अनेक गुन्हे दाखल असल्याचे खडबळ जनक वृत्त आहे.

घटनेच्या दिवशी दि. 26 नोव्हेंबरला परिवारासह खासगी गाडीत सिव्हील ड्रेस वर असताना हात दाखून सुद्धा ट्रॅव्हल्स थांबवली नाही हा राग धरून ब्रम्हपुरी ठाणेदार यांनी ख्रिस्तानंद हॉस्पिटल चौक येथे ट्रॅव्हल्स थांबउन प्रथम ट्रॅव्हल्स चालकाला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली मग पोलीस दांड्याने डोक्यावर वार करून रक्तबंबाळ केले तसेच एव्हढ्यावरच न थांबता रक्त बांबळ अवस्थेतच ट्रॅव्हल्स चालवत ठाण्यात लावायला सांगितले. सदर प्रकरणात दिनाक 26 ला ठाणेदारांचे विरोधातील ट्रॅव्हल्स चालकाची तक्रार ब्रम्हपुरी पोलिसांनी घेतली नसल्याने ट्रॅव्हल्स चालकाने दिनाक 27 ला उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे कडे तक्रार केली.ट्रॅव्हल्स चालकाने जिल्हा पोलिस अधीक्षक यांना केलेल्या तक्रारीत ठाणेदार सिव्हील ड्रेस मध्ये परिवारसह ज्या खासगी वाहनात बसले होते त्या वाहनाचा क्रमांक MH-29-AR-8855 नंबर असल्याचा उल्लेख केला आहे. सुत्राकडून प्राप्त माहिती नुसार सदर वाहन क्रमांक MH-29-AR-8855 इंनोवा क्रिस्टा हे यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील हाफिज रहेमान यांचे नावाने नोंदणी असून या व्यक्तीचे नावाने जुगार,मटका बाबतचे अनेक ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

ठाणेदार पद असलेल्या जबाबदार व्यक्ती वापरत असलेले खासगी वाहन हे एका गुन्हेगार प्रवूत्तीच्या व्यक्तीच्या नावाने असल्याने शहरात चर्चेचा विषय बनलेला असून अनेक तर्क वितर्क लावले जात आहे.

चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये दिनांक 8 नोव्हेंबर 2021 ला 858/2021 अंतर्गत एफ आय आर दाखल झाली होती. पोलीस विभागाला गोपनिय माहिती मिळाली की राजेश गुप्ता रा. बाबा नगर हा त्यांचे घरी काही लोकांना जमवून 52 तास पत्त्यावर पत्त्यांचा पैशाची बाजी लावून हार जितचा खेळ खेळवीत आहे. सदर माहिती मिळताच माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांचे नेतृत्वात रेड करण्यात आली होती. सदर प्रकरणात एकूण 19 लोकांना विरोधात कलम 4,5 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा नोंदणीत आला होता तसेच त्यांचे कडून एकूण 36,57,750/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

सदर प्रकरणात 19 आरोपीमध्ये हाफिज रहमान रा.वणी यांला सुद्धा अटक करण्यात आली होती. त्यावेळेस चंद्रपूर पोलीस ठाण्यात ठाणे प्रभारी म्हणून सुधाकर आंबोरे असल्याची माहिती आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये