श्रध्दानगर येथील सार्थ वडस्कर याची महाराष्ट्र शालेय व्हॉलीबॉल संघात निवड
कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सार्थ याचे घरी जाऊन केले कौतुक
चांदा ब्लास्ट
श्रध्दानगर येथील सार्थ सुनिल वडस्कर याची महाराष्ट्र शालेय व्हॉलीबॉल संघात निवड झाल्याबद्यल काँग्रेस पक्षाचे वतीने सत्कार करण्यात आला. कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा बाजार समिती राजूरा चे संचालक उमाकांत धांडे यांनी सार्थ याचे घरी जाऊन कौतुक केले.
यावेळी तुकूम येथील काँग्रेस पक्षाचे नेते तथा इंटकचे जिल्हाध्यक्ष विजय धोबे, कॉग्रेसच्या असंघटीत विभागाचे जिल्हाध्यक्ष संदीप सिडाम, शिवसेना नेते राहुल विरूटकर, विभागाचे जिल्हाध्यक्ष संदीप सिडाम, शिवसेना नेते राहुल विरूटकर, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अनिल डहाके, सचिव अॅड विलास माथनकर यांची उपस्थिती होती.
सार्थ वडस्कर हा सेंट मायकल इंग्लिश स्कुल चा इयत्ता ७ वी चा विद्यार्थी असून डिसेंबर महिण्यात ओडीशा येथील भुवनेश्वर येथे होणा- या शालेय राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये तो राज्याचे नेतृत्व करणार आहे. चंद्रपूर येथील जिल्हा क्रिडा व्हॉलीबॉल प्रशिक्षण केंद्र येथे व्हॉलीबॉल क्रिडा मार्गदर्शक संदिप उईके यांचे मार्गदर्शनाखाली तो प्रशिक्षण घेत असून खेळासोबतच अभ्यासातही तो हुशार आहे.