ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मूल येथील नव्याने तयार झालेल्या व्यापारी संकुलला ‘क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले व्यापारी संकुल’ असे नाव द्या

राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अजित पवार गटाची आग्रही मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संजय पडोळे

       क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत मूल शहरांमध्ये नगरपरिषदेने नव्याने तयार केलेल्या व्यापारी संकुलला क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व्यापारी संकुल असे नामकरण करण्याची आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट )वतीने मूल नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांची भेट राष्ट्रवादी काँग्रेसचे मूल शहर अध्यक्ष आकाश येसनकर यांनी केली.

महात्मा जोतीराव फुले ‘पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी’चे [Pune commercial & contracting Company] कार्यकारी संचालक होते. एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती, व्यापारी आणि नामवंत शेतकरी म्हणून महात्मा जोतिरावांचा नावलौकिक होता. या कंपनीने धरणं, कालवे, बोगदे, पूल, इमारती, कापडगिरण्या, राजवाडे, रस्ते आदींची भव्य आणि देखणी बांधकामं केली. जोतीरावांच्या उद्योगपती, कार्यकारी संचालक, अर्थतज्ज्ञ आणि शेअर मार्केटविषयक योगदानाकडे जाणकारांचं अद्याप पुरेसं लक्ष गेलेलं नाही.आता च्या व्यापारी तत्वावरील सर्व व्यवहारा मध्ये भ्रष्ट व्यवहार आढलून येतात.त्यानी खडकवासला धरणाच्या बांधकामात दिलेल्या योगदानातील त्यांचा स्वच्छपणा वाखानण्या जोगाच! व्यापार ,उद्योग क्षेत्रात दिलेले योगदान,त्यातून मिळालेले न्याय्य आणि प्रामाणिकपणाचे धडे त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्या इतकेच महत्त्वाचे. त्यांच्या कार्याचा उदो उदो करण्याची संधी त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ मुल शहराला नामकरनाच्या माध्यमातून मिळत आहे.रंगमंचावर झालेल्या नगरपालिकेच्या व्यापरिसंकुलाचे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व्यापारी संकुलन असे नामकरण करण्यात यावे ही निवेदनाद्वारे नम्र विनंती करण्यात आली.

        सदर मागणी ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मूल तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रोहित कामडे आ.भा.समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले,हसनभाऊ वाढई,कैलाश चलाख, गुरु भाऊ गुरनुले, विवेक मुक्तेलवार, नलिनीताई आडपवार, शोभाताई बेलसरे, समताताई बनसोड, राधिका बुक्कावार, मनोज दाबणपल्लीवर,यांनी पाठिंबा दर्शिवला.

    निवेदन देताना राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष आकाश येसनकर,महेंद्र गोगले,प्रणय रायपुरे,रजत कुकडे, निहाल गेडाम,वतन चिकाटे, रुपेश मेश्राम, तरबेज सय्यद, उबेद शेख, रोहित खोब्रागडे, साहिल बारसागडे, मंथन सिडाम, कमरान खान, शुभम बंडीवार, राहुल वाघमारे, निलेश वाळके, कृष्णा बोरेवार, प्रविण बोबाटे, शुभम निगमगडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये