गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांची धडक कार्यवाही

रेतीची वाहतूक करताना ट्रकसह एकुण 30 लाख 81 हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

         दि. 11/10/24 रोजी स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा येथील दोन पथक पो.स्टे. समुद्रपूर परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असतांना मुखबीरद्वारे माहिती मिळाली की, एक 16 चक्का ट्रक क्र. MH-40-CT-5932 चा चालक व मालक हे संगणमत करून मौजा – वैरागड जिल्हा गडचिरोली येथील नदीचे घाटातून पांढरी ओली रेती शासनाचा कोणताही पास परवाना (रॉयल्टी) नसतांना चोरी करून वाहतूक करीत आहे.

अशा माहितीवरून शेडगाव फाटा त. समुद्रपूर जिल्हा वर्धा परिसरात नाकेबंदी करून रेड केला असता एक शेंदरी रंगाचा टाटा 4825 C कंम्पनीचा 16 चक्का ट्रक क्र. MH-40-CT- 5932 चा चालक आरोपी नामे 1) ट्रॅक चालक – ज्ञानेश्वर प्रेमदास मैद, 38 वर्ष, रा. पिंपरी (मेघे) वर्धा हा त्याचा आरोपी क्रमांक 2) ट्रॅक मालक- जुबेर खान रा. वर्धा (पसार) याचे सांगणे वरून शासनाचा कोणताही पास परवाना (रॉयल्टी) नसतांना ओल्या पांढऱ्या रेतीची वाहतूक करतांना मिळून आले आरोपी क्र. 1 चे ताब्यातुन एक 16 चक्का ट्रक व 09 ब्रास (900 फूट) पांढरी ओली रेती असा एकूण जु. किं. 30,81,000/- रू चा मुद्देमाल जप्ती पंचनामा प्रमाणे जप्त करुन नमूद आरोपींना विरुद्ध पो. स्टे. समुद्रपूर येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

        सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधिक्षक डाॅ. सागर कवडे, यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस अंमलदार संतोष दरगुडे, चंद्रकांत बुरंगे, धर्मेंद्र अकाली, भूषण निघोट, मनीष कांबळे, महादेव सानप, पवन पन्नासे, अमोल नगराळे, सुगम चौधरी, हर्षल सोनटक्के सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये