ऑटोरिक्षा चालकाच्या मागणीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर
ऑटोरिक्षा चालकांच्या वतीने संविधान दिनानिमित्य २६ नोव्हेंबर ला राज्यभर धरणा आंदोलन
चांदा ब्लास्ट
महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने ऑटो रिक्षा चालकांच्या विविध मागण्याची पुर्तता करण्याकरिता चंद्रपूर जिल्हा जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले. दि. २४/११/२०२३ रोजी ऑटोसंघटनेचे सर्व पदाधिकारी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात निवेदन सादर केले. ऑटोरिक्षा चालकांच्या वतीने संविधान दिनानिमित्य २६ नोव्हेंबर ला राज्यभर धरणा आंदोलन राबविण्यात येत आहे.
तसेच येत्या हिवाळी अधिवेशनावर ११ डिसेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलन आयोजित केले आहे. या मागणीचही पुर्तता त्वरीत व्हावी. राज्यातील ऑटोरिक्षा चालकांना कल्याणकारी मंडळ घोषित झाले आहे. त्यांची अमलबजावणी त्वरीत करण्यात यावी. ऑटोरिक्षा चालकांचे कल्याणकारी मंडळाचा अध्यक्ष त्वरीत स्थापित करण्यात यावा.
या मागणीला घेवून ११ डिसेंबर ला भव्य मोर्चा आयोजित केला आहे. तरी राज्यातील सर्व ऑटोरिक्षा चालकांना या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन ऑटोरिक्षा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर, जिल्हाध्यक्ष मधुकर राऊत, उपाध्यक्ष जहीर शेख, सचिव सुनिल धंदरे, संघटन प्रमुख विनोद चन्ने, कुंदन रायपुरे, रमेश मुन, मंगेश चवरे, सुनिल पाटील, विलास जुमडे, अनिल मिसाळ, परशुराम तुराडे, किशोर राजगोईनवार, मारोती दानव, महादेव करंबे, किरण मस्कावार, तुळशिराम वालकोंडावार, सुरेश क्षिरसागर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.



