Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विठ्ठलाची काकड आरती महोत्सव कार्तिक पोर्णिमानिमित्य २७ नोव्हेंबरला भव्य मिरवणूक

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पूजा करून मिरवणूकीस सुरूवात

चांदा ब्लास्ट

विठ्ठल मदिर प्रभाग क. १५ येथील हनुमान मंदिरात मागील दि. २०.१०.२०२३ ते दि. २७.११.२०२३ पर्यंत काकड आरती महोत्सव सुरू आहे. सांस्कृतिक कार्यकम रोज भजन व विविध प्रकारचे कार्यकम सुरू आहे. दि. २७.११.२०२३ रोजी कार्तिक पोर्णिमा निमित्य विठ्ठलाची काकड आरतीची मिरवणुक सकाळी ६.०० वाजता पुजा करून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत काढण्यात येणार आहे. ही मिरवणुक वार्डभर फिरवून गांधी चौक मार्गे पठाणपुरा येथील नदी संगमावर विसर्जन करण्यात येणार आहे.

त्यानंतर दि. २८.११.२०२३ ला सांय. ७.०० वा. महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तरी शहरातील विठ्ठल भक्तांनी महाप्रसादाचा स्वाद घ्यावा व मिरवणूकीला मोठ्या संख्येत उपस्थित राहावे,

असे आवाहन हनुमान वारकरी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र खांडेकर, सचिव नागेश देशमुख, काकड आरती महोत्सव समितीचे अध्यक्ष सुधाकर बुटले, कार्याध यक्ष तुळशीरामजी आंबटकर, उपाध्यक्ष विनोद शेरकी, सचिव नितीनजी बोडके, कोषाध्यक्ष शशिकांतजी नागापुरे, सह कोषाध्यक्ष राहुल पाल, सह सचिव संतोष वाकुलकर अशोक नवघडे, मुकेश धोडरे, गणेश भेंडारे यांनी एका पत्रकाव्दारे कळविले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये