शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेचे पदाधिकारी जाहीर
पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे व नेते, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांतर्फे नेते युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना व युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई, युवा सेना कार्यकारी सदस्य हर्षल काकडे, शीतल देवरुखकर-सेठ, युवा सेना पूर्व विदर्भ सचिव तथा सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांचे आभार मानण्यात आले आहे.
यामधे उपजिल्हा युवा अधिकारी- शरद पुरी (वरोरा विधानसभा), विधानसभा युवा अधिकारी अभिजित कुडे (वरोरा विधानसभा), विधानसभा चिटणीस उमेश काकडे (वरोरा विधानसभा), तालुका युवा अधिकारी – विक्की तवाडे (वरोरा तालुका), तालुका समन्वयक- शुभम कोहपरे (वरोरा तालुका), तालुका चिटणीस फैजल शेख (वरोरा तालुका), उपतालुका युवा अधिकारी- हेमंत खुशाल शेरकी (खांबाडा आबमक्ता जि.प. गट), शैलेश खिरटकर (चिकणी टेमुर्डा जि.प. गट), रूपेश चिंचोलकर (चरूरखटी सालोरी जि.प. गट), सूरज सूर्यवंशी (शेगाव बोर्डा जि.प. गट), रामनांद महादेव वसाके (माढळा-नागरी जि.प. गट), शहर युवा अधिकारी- प्रज्वल जाणवे (वरोरा शहर), शहर चिटणीस सृजन मांढरे (वरोरा शहर), तालुका युवा अधिकारी- राहुल मालेकर (भद्रावती तालुका), तालुका समन्वयक गौरव नागपुरे (भद्रावती तालुका), तालुका चिटणीस अनिरुद्ध वरखडे (भद्रावती तालुका), उपतालुका युवा अधिकारी- सतीश आत्राम (नंदोरी कोकेवाडा जि.प. गण), विभाग युवा अधिकारी- महेश येरगुडे (नंदोरी कोकेवाडा जि.प. गण), विकास कंडे (घोडपेठ-कोढा जि.प. गण), शहर युवा अधिकारी- मनोज पापडे (भद्रावती शहर), शहर चिटणीस- समीर बलकी (भद्रावती शहर), शहर समन्वयक तेजस कुंभारे (भद्रावती शहर), उपशहर युवा अधिकारी- गौरव कैलास नवघरे (भद्रावती शहर), गोपाल पारोथे (भद्रावती शहर), साहिल काकडे (भद्रावती शहर), सोशल मिडिया समन्वयक- गोपाल सातपुते (भद्रावती शहर) या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पाईक होवून व समाजकारणाला प्राधान्य देवून राजकारण करावे, क्षेत्रात काम करीत असताना जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रक्रम द्यावा, व शिवसेनेच्या विचारांना घराघरात पोहोचवावे असे या नियुक्तीच्या निमित्ताने रविंद्र शिंदे यांनी म्हटले आहे.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, चंदपूर जिल्हा महिला आघाडी प्रमुख नर्मदा बोरेकर, उप-जिल्हा प्रमुख भास्कर ताजने, युवा सेना जिल्हा अधिकारी मनीष जेठानी, युवतीसेना जिल्हा युवती अधिकारी प्रतिभा मांडवकर, विधानसभा समन्वयक वैभव डहाणे, विधानसभा संघटक मंगेश भोयर, भद्रावती तालुका प्रमुख नरेंद्र पढाल, वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, महीला आघाडी उपजिल्हाप्रमुख माया नारळे, वरोरा शहर प्रमुख खेमराज कुरेकर, भद्रावती शहरप्रमुख घनश्याम आस्वले, वरोरा तालुका प्रमुख महिला आघाडी सरला मालोकार, भद्रावती तालुकाप्रमुख महीला आघाडी तथा युवतीसेना जिल्हा समन्वयक अश्लेषा जिवतोडे भोयर, भद्रावती शहर महीला आघाडी प्रमुख सहमाया टेकाम, उपतालुका संघटिका शिला आगलावे, युवतीसेना उपजिल्हाधिकारी शिव गुडमल, भद्रावती तालुका युवती अधिकारी नेहा बनसोड, भद्रावती शहर समन्वयक भावना खोब्रागडे, माजरी शहर प्रमुख रवि राय, रवि भोगे, शेगाव (बु.) प्रमुख गजानन ठाकरे, युवासेना सैनिक रोहन खुटेमाटे व समस्त वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व शिवसैनिकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
सदर प्रसिध्दी माजी नगरसेवक प्रशांत कारेकर, प्रसिध्दी प्रमुख रवि कावळे, यांनी दिली आहे.
वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर यांचे वाढदिवस अभिष्टचिंतन
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कार व अभिनंदनाप्रसंगी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर यांचा वाढदिवस शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या वतीने साजरा करण्यात आला. या निमित्ताने केक कापून त्यांना शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या.