ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

परवानाधारक दारू विक्रेता देतोय अवैध दारू विक्रीला प्रोत्साहन

तालुक्यातील अनेक खेडेगावात मोठया प्रमाणात अवैधरित्या दारूचा पुरवठा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

हा अतिदुर्गम, आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त भाग असलेला तालुका आहे. येथे शासनाची परवानगी असलेल्या परवानाधारक देशी दारू दुकानातूनच तालुक्यातील अनेक खेडेगावात मोठया प्रमाणात अवैधरित्या दारूचा पुरवठा होत असल्याचे समोर येत आहे. या दारू दुकानातून दिवस-रात्र देशी दारूच्या पेट्याच्या-पेट्या व त्यातील बॉटल पोत्यात भरून सर्रास या दुचाकी व चारचाकीने पुरवठा करून विक्री केली जात आहे. देशी दारू दुकानातून अवैध दारू विक्री करणाऱ्या लोकांना कमी किंमतीत दारूच्या पेट्यांची विक्री करून महिन्याकाठी लाखो रुपयांचा व्यवहार अवैधरित्या सुरू आहे. याबाबत पोलीस विभाग व राज्य उत्पादन शुल्क यांना संपूर्ण माहिती असून ते मांजरी प्रमाणे डोळे बंद ठेऊन दूध पित आहेत.

परवाना धारक दुकानदारांना नियमाने चिल्लर विक्रीचे अधिकार आहेत. मात्र दररोज १०० ते २०० पेट्या दारू अवैधरित्या विकल्या जात आहे. तसेच ७० रुपये दारूच्या शिशीचा भाव असताना ८० रुपये व ३५ रुपये शिशीचा भाव असतांना ४० रुपयांना विक्री करून ग्राहकांची लूट सुरू आहे. तसेच अल्पवयीन मुलांनाही दारू विकली जात आहे. दारू पिण्याचा परवाना असल्याशिवाय दारू देण्याचा अधिकार नसताना पैसे कमविण्याकरिता दारू दुकानात सर्वांनाच दारूची विक्री केल्या जात आहे.

तालुक्यातील ७० टक्के जनता व्यसनाधीन झाली आहे. तर अनेकांचे जीवन उद्धवस्त झाले आहेत.पैसे कमविण्याच्या नादात तरुण युवक दारू, जुगार, सट्टाच्या आहारी जाऊन गुंडप्रवृत्तीचे  झाल्याचे दिसत आहेत. तालुक्याच्या लोकसंख्ये नुसार तालुक्यात दारूविक्री किती होते याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहीत असून सुद्धा या मोठया प्रमाणात दारू सेल करणाऱ्या दुकानदाराला का जाब विचारला जात नाही किंवा शासकीय दरापेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्या दुकानदारावर संबंधित विभागाकडून कार्यवाही करून परवाना रद्द का केला जात नाही असा संतप्त प्रश्न तालुक्यातील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये