ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीकृष्ण सभागृह कोरपना येथे रक्तदान शिबिर

141 रक्तदात्यानी मोठ्या उत्साहात रक्तदान केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने मा देवराव भाऊ भोंगळे विधानसभा प्रमुख तथा माजी भाजपा जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे सत्कार मुर्ती मा.  देवराव भाऊ भोंगळे विधानसभा प्रमुख तथा माजी जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर व त्यांच्या अर्धागीनी भोंगळे ताई उपस्थित होत्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना जिल्हा उपाध्यक्ष तथा संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष प्रमुख पाहुणे सतिशभाऊ उपलंचिवार शहर अध्यक्ष गडचांदुर, हरिभाऊ घोरे शहर महामंत्री, किशोर बावणे सहकार आघाडी प्रमुख, अरुण भाऊ मडावी माझी सरपंच, पुरुषोत्तम भोंगळे तालुका उपाध्यक्ष,अरुण भाऊ डोहे नगरसेवक, विजयालक्ष्मी ताई डोहे महिला आघाडी जिल्हा महामंत्री, रमेश पा मालेकर जेष्ठ नेते, शशिकांत आडकीने, वसंतराव बाहिरे, आशीष भाऊ ताजने युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, ओम पवार युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष,सौ इंदिराबाई कोल्हे,श्रीमती जयाताई धारणकर,सौ रेशमाताई मडावी सरपंच,सौ वौशालीताई मडावी आदी मान्यवर उपस्थित होते.

मा.  देवराव भाऊ भोंगळे विधानसभा प्रमुख तथा माजी जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर यांचे स्वागत तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर यांनी केक भरवुन,शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या विधानसभा प्रमुख देवराव भाऊ भोंगळे यांनी वाढदिवसाच औचित्य साधून केक कापून आपले मनोगतात व्यक्त करताना माझ्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले व 141 रक्तदात्यांनी रक्तदान केले मी रक्त दाते व भाजपा पदाधिकारी,कार्यकर्त्यांचा रुणी आहो माझा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व सन्मान केला तसेच रक्त दात्यानी मोठ्या प्रमाणात रक्त दान केल्या बद्दल सर्वांचे अभिनंदन करतो.

अशा भावना व्यक्त केल्या तसेच तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात देवराव भाऊ भोंगळे विधानसभा प्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते रक्तदाते नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन रक्त दान शिबिरात सहभागी होऊन 141 रक्त दात्यानी मोठ्या उत्साहात रक्त दान केल्या बद्दल सर्वांचे अभिनंदन केले व आभार मानले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य जगदीश पिंपळकर,प्रमोद पायगन,प्रमोद वराटे,मनोहर झाडे,तिरुपती कन्नाके,दिनेश खडसे,कार्तिक गोंडलावार, प्रमोद कोडापे,नैनेश आत्राम सरपंच,उमेश पेंदोर सरपंच,संतोष जोगी,विलास पारखी, पानघाटे,अब्रारअली पत्रकार,प्रमोद गिरडकर, पत्रकार,सागर दुर्वे मिडीया प्रमुख,पवन बुर्रेवार आदिंनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम भोंगळे यांनी केले तर आभार जगदीश पिंपळकर यांनी मानले

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये