नुसकान ग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करा – नितीन गोहने
सावली तालुक्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव ; तहसीलदार साहेब व तालुका कृषी अधिकारी सावली यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार
तालुक्यातील शेतकरी बांधवांचे शेतीमधील मुख्य उत्पादनाचे पिक म्हणजे धान/भात शेती हे आहे व सध्या धान या पिकाच्या कापणीला सुरुवात झालेली असून उभ्या धानाला व कापणी चालू असलेल्या धान पीकाला लष्करी अळी, कळा-करपा, मानमोळी या रोगामुळे धान पिकाचे लोंबा झडत असल्याने हातात आलेले पीक जाण्याचे संकट ओढावत आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी बांधवाना त्रास सहन करावा लागत आहे.
काही दिवसापूर्वी मावा तुडतुडा, खोड किडा सारखे अनेक रोगाची लक्षणे होती मात्र त्यावर वेळीच उपचार झाल्याने काही प्रमाणात आटोक्यात आले मात्र सध्या लष्करी अळी,कळा-करपा, मानमोळी या रोगामुळे धान पीकाचे ४०-५०% नुस्कान होत असून कृषी विभागाने त्यासंबधित विशिष्ट उपाययोजना सांगावे, व शेतकऱ्यांच्या झालेल्या धान पिकांचे नुकसान पंचनामे करून लवकरात लवकर शेतकर्यांना आर्थिक नुसकान भरपाई मिळण्याकरिता सहकार्य करावे अशी मागणी सावली तालुका काँग्रेस कमेटीतर्फे करण्यात आली आहे.
यावेळी निवेदन देताना सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहणे,माजी सभापती विजय कोरेवार,शहर अध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार, युवक काँग्रेस अध्यक्ष किशोर कारडे, युवक शहर अध्यक्ष अमर कोनपत्तीवार,उसेगावचे सरपंच चक्रधर दुधे, बोथलीचे उपसरपंच नरेश गड्डमवार,जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ते प्रशांतजी राईंचवार,भोगेश्वर मोहुर्ले,कमलेश गेडाम,नानाजी तावाडे,जगदीश वासेकर, यश गेडाम तसेच आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
रोगराईमुळे सावली तालुक्यातील ४०-५० टक्के शेतकऱ्यांचे मोठे नुसकान झाले असून त्यांना लवकरात लवकर कृषी पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी यासाठी प्रशासनास तहसीलदार साहेब व तालुका कृषि अधिकारी सावली यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे- नितीन गोहने, अध्यक्ष सावली तालुका काँग्रेस कमिटी.