ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संताजी नगर येथे दोन भाडेकरू कडे घरफोडी

एका लाखाचे दागिने चोरट्यांनी केले लंपास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       शहरातील संताजी नगर येथे राहणारे दोन भाडेकरू बाहेर गावी गेले असता अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून दोघांच्याही घरातून सोन्याचे दागिने चोरी केल्या ची घटना रविवारच्या मध्यरात्री घडली.

     याप्रकरणी भद्रावती पोलिसांनी गुन्हा दाखल करून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू केला आहे.

       संताजी नगर येथील नारायण शेंडे यांचे घरी ज्ञानेश्वर अंबागड व प्रतिभा मूनले हे दोन भाडे करू राहतात. घटनेच्या दिवशी हे दोघेही दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून दोघांच्याही घरातील सोन्याचे दागिने किमान किंमत एक लाख रुपये असे लंपास केले. या घटनेची माहिती घर मालकाला होताच त्यांनी या बाबतची सूचना घर भाडेकरूंना दिली तसेच या घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना देताच ठाणेदार अमोल काचोरे यांनी घटनास्थळी श्वान पथक बोलावून तसेच फिंगरप्रिंट एक्सपर्ट चा माध्यमातून तपासचक्र सुरू केले असून या अज्ञात- चोरट्यांचा पोलीस शोध घेत असुन बातमी लिहे पर्यंत या अज्ञान चोरट्यांचा शोध सुरू आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये