ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाकाली यात्रा परिसराचा विकास आराखडा तयार करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जिल्हाधिकारी यांना निर्देश

चांदा ब्लास्ट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाकाली मंदिर यात्रा परिसराचा विकास आराखडा तयार करण्याबाबत अधिकाऱ्यांना सुचित केले होते. दरम्यान काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चंद्रपूर दौऱ्यावर असतांना त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी भेट देत अम्माची भेट घेतली या दरम्यान त्यांनी महाकाली यात्रा परिसराचा विकास करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांना दिले आहे. यावेळी मुख्यमंत्री यांचे सचिव विकास खारगे, संपर्क प्रमुख किरण पांडव आदींची उपस्थिती होती.

चंद्रपूरात आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने श्री माता महाकाली महोत्सवाला सुरवात करण्यात आली आहे. हा महोत्सव चंद्रपूरकरांच्या लक्षणीय सहभागाने राज्यभरात पोहोचला आहे. त्यामुळे राज्यासह देशातील माता महाकाली भक्त चंद्रपूरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने येणार आहे. तसेच चैत्र महिण्यात येथे नांदेडची यात्रा भरते या यात्रेत नांदेडसह राज्याबाहेर भाविक लाखोंच्या संख्येने दाखल होतात. मात्र येथे अपेक्षित अश्या सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे या यात्रा परिसराचा विकास व्हावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चंद्रपूर दौऱ्यावर असतांना त्यांनी सदर आराखडा तत्काळ तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना केल्या आहे.

अम्माचा आर्शिवाद मिळाला, आता नव्या उर्जेने काम करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…..

अम्मा का टिफिन उपक्रमाचे केले कौतुक..

अम्मा ने सुरु केलेला अम्मा का टिफिन हा उपक्रम राज्यात चर्चेत आहे. अम्माने सुरु केलेले काम राज्यासाठी प्रेरणादाई आहे. अनेकदा किशोर जोरगेवार आपल्या मातोश्री बद्दल कुतुहलाने सांगत असतात आज अम्माची भेट घेता आली. त्यांचा आर्शिवाद घेऊन मुंबईला जात आहे. आता नव्या उर्जेने काम करणार असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

         राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चंद्रपूर दौ-यावर असतांना त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी पोहचत अम्माची भेट घेतली. 2022 ला “मदर हु इंन्स्पायर पुरस्काराने अम्माला सन्माणीत करण्यात आले होते. तेव्हा मुख्यमंत्री यांनी व्हिडीओ कॉल वरुन शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हा अम्माने त्यांना घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यामुळे आज अम्माच्या भेटीला आलो असल्याचे म्हणाले. मुख्यमंत्री सचिव विकास खारगे, विदर्भ संपर्क प्रमुख किरण पांडव, जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन आदींची उपस्थिती होती.

             चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई उर्फ अम्मा जोरगेवार यांचा अम्मा का टिफिन हा उपक्रम राज्यभर चर्चीला जात आहे. सदर उपक्रमाअंतर्गत शहरातील गरजवंताना दररोज घरपोच जेवनाचा डब्बा पोहचविला जात आहे. या कुटुंबासाठी अम्मा आधार ठरली आहे. त्यांच्या या उपक्रमाबदल अनेक संस्थानच्या वतीने त्यांना सन्माणीत करण्यात आला आहे. 2022 साली त्यांना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते मदर हु स्पा इंस्पायर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉल करुन अम्माला शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी अम्माने त्यांना भेटीसाठी चंद्रपूरात आमंत्रित केले होते.

दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चंद्रपूर दौ-यावर असताना त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी पोहचत अम्माची भेट घेतली आहे. यावेळी अम्मा का टिफिन या उपक्रमाची त्यांनी पाहणी करत माहिती जाणून घेतली. हा एक अभिनव सामाजिक उपक्रम असुन राज्याला यातुन प्रेरणा मिळेल. या उपक्रमाबद्दल अनेकदा ऐकल होत. आज भेट देता आली याचा आनंद होत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये