ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी शिक्षणात वेगवेगळ्या संधीचा शोध घेणे गरजेचे – ॲड. दिपक चटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स जिवती येथे आयोजित कला व विज्ञान शाखेतील सत्र २०२१-२२ मधील विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाच्या अनुषंगाने प्रमुख मार्गदर्शक या स्थानावरून बोलताना त्यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना टिकून राहायचे असेल आणि यश संपादन करायचे असेल तर पारंपरिक शिक्षणासोबतच विविध क्षेत्रातील तसेच देश-विदेशातील नामांकित शैक्षणिक संस्था द्वारे देण्यात येणाऱ्या विविध संधी ओळखून त्याचा लाभ घेण्या करिता प्रयत्नरत असणे आवश्यक आहे. निव्वळ पदवी प्राप्त केल्याने शिक्षण संपूर्ण होणार नाही, तर त्या पदवीला एक शस्त्र समजून त्याचा उपयोग समाज उपयोगी होणे अनिवार्य आहेत.

असे ब्रिटिश सरकारची शेव्हनिंग शिष्यवृत्ती प्राप्त ॲड. दीपक चटक यांनी वक्तव्य केले. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्ष या नात्याने ॲड. विठ्ठल महाराज पुरी संचालक व्यंकटेश बहुउद्देशीय संस्था गडचांदुर यांनी विद्यार्थ्यांनी ज्ञानाची भूक कधीही संपवू नये. अविरत ज्ञान मिळवत जाणे हे एक ध्येय विद्यार्थ्यांच्या अंगी असायला पाहिजे. त्या दृष्टीने सदैव प्रयत्नरत असावेत. असे प्रतिपादन केलेत तर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. एस. एच. शाक्य यांनी पदवी प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन, त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीकरिता भरभरून शुभेच्छा दिल्यात. भविष्यात आपण परिवारासोबत समाजाची सुध्दा जिम्मेदारी योग्य रीतीने पार पाडाल अशी आशा व्यक्त केली.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राऊत यांनी केले, तर आभार प्रा. देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये