Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजपा नेता संदीप दायमा यांचा जाहीर निषेध

जिल्हा शहर काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागसह महाविकास आघाडीची कारवाईची मागणी

चांदा ब्लास्ट

भारतीय जनता पार्टी चे नेता संदीप दायमा यांनी विधानसभा निर्वाचन क्षेत्र च्या प्रचार सभेत धर्मस्थल उपळून फेकन्याचे राष्ट्रविरोधी वक्तव्य केल्याने व हा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल होत असल्याने सर्व समाजात त्यांच्या या वक्तव्य बाबत नाराजी व्यक्त केली जात आहे संदीप दायमा यांचे जाहीर निषेध नौंदविन्यासाठी दि. 5/11/2023 रोजी दुपारी 3 वाजता गांधी चौक, चंद्रपूर येथे महाविकास आघाड़ी सोबत निषेध आंदोलन कार्यक्रम घेण्यात आले असुन संदीप दायमा यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग सह महाविकास आघाडी ने केली आहे.

धर्मस्थळाबद्दल समाजविघातक वक्तव्य करणारे संदीप दायमा यांचा निषेध नारेबाजी करून फलक दाखवून व्यक्त करण्यात आला. या निषेध आंदोलनात चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष रामू तिवारी, काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग चे शहर अध्यक्ष अध्यक्ष मतीन कुरेशी इंटक काँग्रेस चे प्रदेश महासचिव के.के. सिंग, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग चे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद रमजान अली, अल्पसंख्यांक विभाग प्रदेश उपाध्यक्ष प्रो. बलबिरसिंह गुरोण, प्रदेश महासचिव रविंद्रसिंह सलुजा, युवक कांग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार,
अल्पसंख्यांक काँग्रेस चे प्रदेश सचिव स्वप्नील शेंडे, ओबीसी काँग्रेस चे प्रदेश महासचिव नरेंद्र बोबडे, शिवसेना बाळासाहेब ठाकरे चे वाहतूक सेनेचे अध्यक्ष स्वप्नील काशीकर, विरुटकर, कुसुमताई उदार,महिला काँग्रेस जिल्हा अध्यक्ष नम्रता ठेमस्कर, काँग्रेस अल्पसंख्यांक चे जिल्हा उपाध्यक्ष बापू अन्सारी,जिल्हा महासचिव सुबस्तियन जॉन,जिल्हा महासचिव शेख मुखत्यार, ओ बी सी चे काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष राहुल चौधरी, काँग्रेस किसान सेल चे जिल्हाध्यक्ष भालचंद्र दानव,नौशाद शेख, गोपाल अमृतकर, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभाग अध्यक्ष अडवोकॅट रुबिना मिर्झा, कुणाल चहारे,प्रविण लांडगे, सचिन कत्याल,राजेश अडुर, युसुफ कुरेशी, अर्जुन कंडा,असंघटित कामगार चा शालिनी भगत, शोभा वाघमारे, अब्दुल एजाज,जमील शेख,बबलू कुरेशी, साबीर सिद्दीकी, एजाज कुरेशी, हाजी अली, सय्यद मोबिन, परवीन सय्यद, सह महाविकास आघाडीतील अनेक मान्यवर या निषेध आंदोलन मध्ये सहभागी होते.

देश संविधान प्रमाणे चालणार कोणाच्याही मर्जी ने चालणार नाही असे वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या नेत्यांना धडा शिकविणे गरजेचे आहे व सामान्य जनता ही आता जागरूक झाली आहे असे धर्मविरोधी वक्तव्य करणाऱ्यास जनता माफ करणार नाही असे मत मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये