ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती शहराच्या विकासात्मक कामासाठी २५ कोटी रुपये देण्यात यावे

मिनलताई आत्राम माजी अध्यक्ष न.प. भद्रावती यांची मागणी

चांदा ब्लास्ट

भद्रावती ता.प्र. भद्रावती शहरातील मुख्य रस्त्याच्या कामासाठी तसेच गवराळा प्रभागातील चिरादेवीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या विकासात्मक कामासाठी मा. नामदार नितीनजी गडकरी केंद्रीय रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्री यांचे कडे सी. आर.एफ. योजने अंतर्गत २५ कोटी रुपये देण्याची मागणी मिनलताई आत्राम माजी अध्यक्ष न.प. भद्रावती यांनी केली आहे.

याबाबत सविस्त वृत्त असे की भद्रावती शहरामध्ये पवित्र नागमंदिर, जैन मंदिर, बुध्द लेणी, गणेश मंदिर, भवानी माता मंदिर तसेच रेल्वे स्टेशन असुन अशा विविध समाजाच्या भावनांशी जुळून नटून असलेले पर्यटन तिर्थ स्थळ आहे. भद्रावती शहराला एकमेव मुख्य रस्ता असुन या रस्त्याला खुप खड्डे पडलेले आहेत या मुख्य रस्त्याच्या कामासाठी नगर परिषदेचा निधि कमी पडत असल्याने रस्त्याचे सिमेंट कॉंक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे कठिण झाले असल्याने मिनलताई आत्राम माजी अध्यक्ष न.प. भद्रावती यांनी मा. नामदार गडकरी साहेब केंद्रिय रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्री यांचेकडे धाव घेऊन भद्रावती शहराच्या मुख्य रस्त्याच्या बांधकामसाठी प्रत्यक्ष निवेदन देऊन २५ कोटी रुपये क्रेंद्रिय मार्ग निधि मधुन देण्यात यावे तसेच दोनही रस्ते अति महत्वाचे रस्ते असून शासन जी. आर भारत सरकारचे राजपत्र दि. १०/०७/२०१५ नुसार सी. आर.एफ. निधीच्या निकसात बसत असल्याने रस्त्याचे कामे तात्काळ मंजुर करण्यात यावे अशी मागणी केली.

हायवे रोड पेट्रोल पंप पासुन ते रेल्वे स्टेशन पर्यंत सिमेंट कॉक्रीट रस्त्याचे काम करण्यासाठी २० कोटी रुपये लागत असल्याने या रस्त्याचे काम झालेले नाही. तसेच गवराळा गावातुन चिरादेवी कडे जाणारा टि. पॉइंट पर्यत व ४ ते ५ गावांचा मुख्य रस्ता असुन या रस्त्याचे सिमेंट कॉक्रीट रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी ५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे व एवढा खर्च नगर परिषद भद्रावती करु शकत नसल्याने या दोन्ही रस्त्याचे काम थंड बस्त्यात असून पर्यंटन स्थळ असलेल्या गावाचे तीन तेरा वाजले असून भद्रावती शहरातील अति महत्वाचे मुख्य रस्त्याच्या कामासाठी मा. ना. हंसराजभैय्या अहीर, माजी केंद्रिय गृहराज्यमंत्री भारत सरकार यांना दि. २८/०६/२०१५ ला निवेदन दिले.

तसेच मा. ना. सुधिरभाऊ मुनगंटीवार पालकमंत्री म. रा. यांना दि. ०७/०३/२०१५ ला निवेदन देण्यात आले आहे. या दोनही मंत्री महोदयांकडून भद्रावती शहरातील नागरीकांच्या खुप मोठ्या अपेक्षा असल्याने आपण जातीने लक्ष देऊन रस्त्याच्या कामासाठी पुन्हा पाठपुरावा करुन भद्रावती शहराच्या विकास कामाला तदज करावी तसेच मा. ना. नितीनजी गडकरी केंद्रिय रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्री यांनी भद्रावती शहराच्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही कामासाठी तात्काळ २५ कोटी रुपये केंद्रिय मार्ग निधि अंतर्गत देण्यात यावे अशी मागणी मिनलताई आत्राम माजी अध्यक्ष न.प. भद्रावती यांनी मा. गडकरी साहेब यांना प्रत्यक्ष निवेदन देऊन केली आहे. यावेळी प्रामुख्याने नानाभाऊ दुर्गे, योगेश मॅनेवार, अक्षय आसकर, मनोज बुच्चे, निकेश घाटे, शुभम चौधरी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये