ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ना. मुनगंटीवार यांचा कोरपना तालुक्यातील प्रलंबित कामांना गती देण्यासाठी पुढाकार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना तालुक्यात विकास कामे रखडल्याने त्याचा परिणाम दुर्गम आदिवसी भागात होत असल्याने प्रदूषण भुगर्भात पाणी पातळी खालावलेली परिस्थीती पर्यावरण तसेच विकास कामे रखडल्याने सिंचनासाठी आवश्यक विकास कामाची गरज या करीता राष्ट्रवादी कॉग्रेसचे सहसचिव आबिद अली यांचे सह गणेश वाभिटकर विनोद जुमडे रमेश डाखरे विकास टेकाम यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वन मत्स्य व्यवसाय मंत्री यांची भेट घेऊन चांदा ते बांधा योजना अंतर्गत ९ कोटीचे अमलनाला पर्यटन क्षेत्रसंकुल पूर्ण झाले असताना नियमाक मंडळाच्या लालफितशाहीत अडकले त्यामुळे पर्यटकाचा हिरमोड होत असून कोटयवधी चे उत्कृष्ठ ठिकाण होऊन सुद्धा खुले झाले नाही पकड्डीगडम जलाशयाचे पाणी अंबुजा सिमेट कंपनीला दिल्याने लाभ क्षेत्रात ५० % सिंचन गेल्या २० वर्षा पासून साध्य झाले नाही.

त्यामूळे पाणी करार संपुष्टात आणून कोरपना तालुक्यातील सिमेंट उद्योगाला उच्चपातळी बॅरेज पैनगंगेवर बांधून कंपण्याची पाणी गरज पूर्ण करावी व शेतकऱ्याना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करावे तसेच पकड्डीगडम अर्धवट झालेले संचयन क्षेत्रात खोलीकरण कालवे दुरुस्ती व पाईप लाईन द्वारे सिंचन सुविधा निर्माण करावे वन व्यवस्थापन समीतीना वन हक्के पट्टे मिळाले परंतु वनक्षेत्र विकसीत स्थानिकाना रोजगार एफ पि सि च्या माध्यामातुन जैवविविधता व्यवस्थापन वन वुक्ष फळबाग सेन्द्रीय शेती उपक्रमासाठी सहभागी करण्याचे दुष्टीने वन विभाग व रो ह यो मधून निधि उपलब्ध करण्यात यावा.

कोरपना येथील बसस्थानक व्हावे यासाठी जागा पाहणी भुमापन मोजणी झाली मात्र ते काम रखडल्याने कोरपना येथे बसस्थानक मागणी पूर्ण व्हावी कोरपना येथिल तालुका क्रिडांगण करीता ५ कोटी मंजुर झाल्याची घोषणा २० २१ मध्ये प्रसिद्ध झाली मात्र ते हवेतच विरली मात्र क्रिडा संकुल मध्ये सोयी सुविधेचा अभाव असल्याने क्रिडांगणाचा विकास करूण युवकाना क्रिडा क्षेत्रात संधी द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली असता पालकमंत्री सुधिर भाऊ मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणविस यांचेशी भ्रमण ध्वनीवर संवाद साधून अंबुजापाणी करार व अमल नाला पर्यटन स्थळ खुले करण्यासाठी उचित निर्णय घ्यावा असे आवाहन करताच उपमुख्यमंत्री यांनी पाटबंधारे विभागाकडून माहीती सादर करण्याचे निर्देश दिले आहे प्राप्त होताच शासनाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.

इतर मागण्या संदर्भात संबंधितांना निर्देश व पत्र देऊन अहवाल मागितला असल्याने कोरपना भागातील लोकांना समस्या मार्गी लावण्यात येईल असे आश्वस्त केलें

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये