ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मारहाण प्रकरणातील दोन आरोपींना सहा महिन्याची शिक्षा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

      दिवाणी व फौजदारी न्यायालय ब्रम्हपुरी येथे भांदवी कलम ३२४,५०६,३४ अन्वये फौजदारी मामला क्रमांक ४२३/२०२१ प्रलंबित होता. मामल्यातील फिर्यादी नामे राज केशव टेंभुर्णे याने आरोपी नामे सोमनाथ धर्मा टेंभुर्णे याला माहे फरवरी २०२१ मध्ये १ महिण्यासाठी २५०००/- रुपये उसने दिले होते त्यापैकी आरोपीने १५०००/- परत केले व त्यातील उर्वरित १००००/- रुपये फिर्यादीने मागितले असता आरोपी याने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा फिर्यादीने *तुझी मोटारसायकल माझ्याकडे ठेव असे बोलले* असता आरोपी नामे सोमनाथ धर्मा टेंभुर्णे व आरोपीचे भाऊ नामे नरेंद्र धर्मा टेंभुर्णे या दोन्ही आरोपींनी फिर्यादीला जीवे मारण्याची मारण्याची धमकी दिली व *फिर्यादीच्या नाकावर, तोंडावर डोक्यावर काठीने व लाथाबुक्क्यांनी फिर्यादीला मारहाण केली होती.* त्यामुळे फिर्यादीच्या वैद्यकीय तपासणी अहवालानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात तपासी अधिकारी खुशाल उराडे यांच्यासमवेत एकूण ६ साक्षदार तपासण्यात आले. त्यामुळे आरोपीविरुद्ध मिळुन आलेल्या भक्कम पुरावाच्या आधारे न्यायाधीश श्री.डी.बी गुट्टे यांनी आरोपी नामे. सोमनाथ धर्मा टेंभुर्णे व नरेंद्र धर्मा टेंभुर्णे राह.सायगाव या दोन्ही आरोपींना ६ महिन्याची सजा व प्रत्येकी २०००/- रूपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे ॲड.गणेश राऊत यांनी काम बघितले. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली व कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पो.हवा.सुदेश कुमरे आणि ध्रुवबाळ पिलारे यांनी काम बघितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये