ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आठवड्यातील दोनच दिवस तलाठी कार्यालय उघडे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी : संतोष इंद्राळे

जिवती :- तालुक्यातील पाटण येथे नागरिकांसाठी सुरू केलेले तलाठी कार्यालय आठवड्यातून दोनदा उघडत असल्यामुळे नागरिकांना विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच तलाठी कार्यालयात नेहमी उपस्थित राहत नसल्यामुळे हेलपाट्यावर हेलपाटे मारून नागरिकांची दमछाक होत असल्याने हे तलाठी कार्यालय असून अडचण नसून… खोळंबा या प्रमाणे पाटण वासियांची अवस्था झालेली आहे.

पाटण परिसरातील वाढती लोकसंख्या व त्यातच शेतीचे मोठ्या प्रमाणात ‌होणारे नोंदीचे व्यवहार होत असल्यामुळे सातबारा, आठ अ यासह इतर कामकाजासाठी यासाठी नागरिकांना या ठिकाणी सतत यावे लागत आहे. विशेष म्हणजे सदरील तलाठी कार्यालयात नागरिकांची सतत वर्दळ असते. जागेच्या नोंदणीचे फेरफार मंजूर करण्यासाठी तलाठी कार्यालयातून अव्वाच्या सव्वा रकमेची मागणी केली जाते, त्यामुळे या तलाठी कार्यालयात किती व कशा प्रकारचे व्यवहार होतात व केले जातात याची प्रचिती आपोआपच येते.

हे कार्यालय आठवड्याडून दोनदाच उघडत असल्यामुळे येणाऱ्या नागरिकांना आल्या पावलांनी माघारी जावे लागत आहे. त्यातच शेतीच्या वेगवेगळ्या कामासाठी नागरिकांची सतत या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता हे कार्यालय सुरू राहील अशी व्यवस्था तहसिलदारांनी करावी अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये