ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदूरात वार्षिक स्नेहमीलन कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

मित्र संघ परिवार पोस्ट ऑफिस जवळील नागरिकांनी वार्षिक स्नेहमीलन कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच केले होते, या संघातर्फे दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते यावर्षीही कोजागिरी व स्नेहमीलनपर स्नेहभोजन कार्यक्रम घेण्यात आले.

सांस्कृतिक कार्यक्रमात संगीत खुर्ची,विविध नृत्य, दांडिया, डान्स सुगम संगीत गीते, भावगीत,भजन आदि कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये वॉर्डातील लहान मुले मुली,महिला व नागरिक सहभागी झाले होते यावेळी मित्र परिवार संघाचे पदाधिकारी प्रा विजय आकनुरवार,परमहंस मेश्राम, जगदीश ठावरी, रामकृष्ण वनकर,राकेश अरोरा,प्रा शरद बेलोरकर,दिलीप मेश्राम,सत्यनारायण शर्मा, ईश्वर शिवणकर,शंकर शिरसागर,दिवाकर नावडे,जनार्धन घटे, विजया नामेवार, संध्या निखाडे, सौ नयना आकनुरवार,सौ कल्पना मेश्राम,अर्चना अरोरा,वृन्दा वनकर,गीता मेश्राम,कल्पना बेलोरकर, निर्मला ठावरी,सौ नावडे सौ तुरणकार आदीनी कार्यक्रमात सहभाग घेतला,मित्रपरिवार संघाचे वॉर्डातील नागरिक व महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये