Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे यांच्या वेंडली गावातून होणार ओबीसी जनजागृती भेटीगाठी अभियानाची सुरवात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी संघटना , सर्व जातिय संघटना यांची बैठक धानोजे कुणबी समाज सभागृह येथे संचिन राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने जातनिहाय सर्वे करण्यात यावा, ओबीसी विध्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यात मुला मुलींना प्रत्येकी एक वसतिगृह सुरू करण्यात यावे व ज्या विध्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही त्यांना आधार योजना लागू करण्यात यावी आणि अन्य ओबीसीच्या संविधानिक न्याय मागण्या मजूर करून घेण्यासाठी भेटीगाठी जनजागृती अभियान 1 नोव्हेंबर 2023 पासून रविंद्र टोंगे यांच्या वेंडली गावापासून सुरवात होणार असून जिल्ह्यातील 15 तालुक्यात अभियान राबवून समारोप चिमूर तालुक्यात होईल. त्यासंदर्भात निवडक अभियानातील संयोजक यांची नियोजन बैठक घेण्यात आली.

त्या बैठकीत डॉ संजय घाटे, शाम लेडे, रणजित डवरे, अनिल डहाके,विलास माथनकर, नामदेव मोरे डॉ दिलीप कांबळे, सतीश मालेकर, देवराव सोनपित्तरे,भाऊराव झाडे,देवा पाचभाई, नामदेव मोरे, गजानन कष्टी,अरुण देऊलकर,एम व्ही पोटे,एस एम मालेकर,डॉ साईनाथ वाडसकर, के बी पिपालशेंडे,एल राजूरकर, मनीषा बोबडे, कुसुमताई उदार, यांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये