ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“मेरी माटी मेरा देश” अंतर्गत गोंडपिपरी तालुक्यातील माती दिल्ली येथे जाणार…

अभियानासाठी अश्विनी दीपक वांढरे आणि सुरज पी. दहागावकर यांची निवड

चांदा ब्लास्ट

गोंडपिपरी : भारतीय स्वातंत्र्याच्या आझादीच्या अमृत महोत्सव अंतर्गत “मेरी माटी मेरा देश” हे अभियान संपूर्ण देशभरात राबविण्यात आले. या अभियानाअंतर्गत गोंडपिपरी तालुक्यातील प्रत्येक गावातील माती व तांदूळ पंचायत समितीकडे अमृत कलश यात्रेतून गोळा करण्यात आली आहे. आता तो अमृत कलश दिल्ली येथे जाणार आहे.
गोंडपिपरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गजानन मुंडकर यांनी पंचायत समितीच्या वतीने नेहरू युवा केंद्राचे प्रतिनिधी अश्विनी दिपक वांढरे व सुरज पी. दहागावकर यांचेकडे हा अमृत कलश सुपूर्त केला. सदर अमृत कलशचे जिल्हास्तरावर व राज्य सरकारच्या वतीने स्वागत करून दिल्ली येथे पाठविण्यात येणार आहे. गोंडपिपरी तालुक्यातून निवड करण्यात आलेले दोन युवक अश्विनी दिपक वांढरे व सुरज पी. दहागावकर हे गोंडपिपरी तालुक्याच्या वतीने दिल्लीला येथे जाणार आहे.
मेरी माती मेरा देश या अभियानाचा महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय कार्यक्रम हा ऑगस्ट क्रांती मैदान येथे २७ ऑक्टोंबर २०२३ ला होणार असून त्यानंतर दिल्ली येथे १ नोव्हेंबर २०२३ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्तव्यपथ कार्यक्रम आयोजित केला आहे. दिल्ली येथे संपूर्ण देशभरातून आलेली माती एकत्र करून शूरवीराच्या स्मरणार्थ अमृतवाटीकेची निर्मिती केली जाणार आहे.
सदर कार्यक्रमात गट विकास अधिकारी गजानन मुंडकर, अनिल शिंदे विस्तार अधिकारी, जिवन प्रधान विस्तार अधिकारी व गोंडपीपरी तालुक्यातील सर्व ग्राम पंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक इत्यादी उपस्थित होते.
शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये