ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ऊर्जानगरात धम्मचारिकादिन समारंभ सुसंपन्न

चांदा ब्लास्ट

धम्मदायाद मेत्ता संघ तथा धम्मप्रसार समिती दुर्गापूरच्या विद्यमाने कार्यान्वित “बौध्द सभ्यता रुजवन संवर्धन व अभिवृध्दी अभियान” अंतर्गत बौध्दांच्या स्वतंत्र दिनदर्शिकेनुसार कण्ह 1 कार्तिक 2568 बुध्दवर्ष अर्थात 30 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 7.00 वाजता ऊर्जानगर नेरी येथील पंचशिल प्रज्ञाविकास मंडळाचे शालवन बुध्दविहारात धम्मचारिकादिन धम्मउत्सव मोठया उत्साहात पार पडला.

            धम्मचारिकाप्रारंभदिन समारंभाचे विधीवत उदघाटन चंद्रपूरचे मा. जयपाल मेश्रामसर यांचे हस्ते करण्यात आले. यानंतर यशोधरा महिला मंडळाच्या उपासिका संघाकडून सामुहिक बुध्दवंदनेनंतर बुध्द अभिावादन गीताने बुध्दास अभिवादन करण्यात आले. यानंतर सुरू झालेल्या धम्म प्रबोधन सत्रात महिला मंडळाच्या अध्यक्षा शुभांगीताई रामटेके यांनी पहिल्या वर्षावास समाप्तीच्या पर्वावर सुयोग्य पध्दतीने धम्मचांरिका करण्यासाठी बुध्दाने भिक्खू संघास प्रदान केलेला बुध्दिस्ट मिशन मॅडेंट अर्थात बुध्दकृत मानवतेची पालि भाषेतील सनद मराठी व इंग्रजी भाषेतील अनुवादाने स्पष्ट केली. यानंतर प्रचारक अनिल वानखेडे यांनी “वर्षावास समाप्ती पर्व आणि बुध्दकालीन सांस्कृतीक जीवन” या विषयावर सावकांना नाविण्यपूर्ण माहिती प्रदान केली. यानंतर त्यांनी पार पडलेला पवारणा उत्सव तथा धम्मचारिकादिन या द्विदिवसीय समारंभात प्रदान केलेल्या धम्मप्रवचनातील माहितीवर आधारित उपस्थित सावकांसाठी “बुध्दिस्ट क्विज” घेण्यात आली. धम्मप्रवचनातील सावकांची श्रवण क्षमता व स्मरण क्षमता विकसीत व्हावी या उददेशाने 25 प्रश्नांची क्विज मधून विजेत्या तीन सावकांची “सर्वोत्कृष्ठ सावक” म्हणून घोषणा करण्यात आली. यात वनमालाताई खोब्रागडे, शुभांगीताई रामटेके व किरणताई दहिवले या विजेत्या तीन श्रेष्ठ उपासिकांना मुख्य अतिथी हरीदास उराडे व जयपाल मेश्राम सर यांचे हस्ते ग्रंथभेटीने सन्मानित करण्यात आले.

            धम्मचारिका समारंभाचे संचालन सदाशिव नगराळे तथा आभार प्रदर्शन राहुल वावडे यांनी पार पाडले. याप्रसंगी यानंतर येणाऱ्या कार्तिक पूर्णिमा दान दिवसाच्या सदिच्छा प्रदानाने समारंभाची सांगता करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये