ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कार्यवाही

सेवापुस्तीकातील ऋटया दुरुस्त कराण्याकरीता पैश्याची केली मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आलोसे यांनी श्री. जुगलकीशोर अलकनारायणजी बाजपेयी, वय ५१ वर्ष, पद वरीष्ठ लिपीक, जलसंपदा विभाग वर्धा वर्ग – ३ रा. एकविरा अपार्टमेंट फ्लॅट क्र. एस / १०२ दुसरा माळा, शांती नगर रोड, सिंधी मेघे जि. वर्धा १०,००० /- रुपये लाच रक्कम स्विकारले वरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वर्धा कडुन कार्यवाही.

तक्रारदार हे पवनार, जिल्हा वर्धा येथील रहीवासी असुन तक्रारदार पाटबंधारे विभागातुन ३१ जानेवारी- २०२० रोजी मजुर म्हणुन सेवानिवृत्त झाले असुन त्यांना मिळत असलेल्या निवृत्ती वेतन मिळत आहे. आलोसे यांनी तक्रारदार यांचे सेवापुस्तीकातील ऋटया दुरुस्त कराण्याकरीता व बेसिक पगारामध्ये फरक काढुण बिल मंजुरी करीता पाठविण्यासाठी २०,००० /- रु. लाचेची मागणी करुन पहिले १०,००० /- रु. मला द्या व उर्वरित १०,०००/- रु. हे चेकचे पैसे मिळाल्यानंतर मला द्या, असे आलोसे जुगलकिशोर बाजपेयी यांनी मागणी करून १०,०००/- रू. स्विकारण्याची तयारी दर्शवली. परंतु तक्रारदार यांची आलोसे यांना लाच देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वर्धा येथे दि.०८/०६/२०२३ रोजी तक्रार नोंदविली.

तकारदाराने दिलेल्या तक्रारीवरून लाच मागणी संबंधाने दि. ०९/०६/२०२३ रोजी पडताळणी व सापळा कार्यवाही करण्यात आली असता आलोसे श्री. जुगलकीशोर अलकनारायणजी बाजपेयी, वय ५१ वर्ष, पद वरीष्ठ लिपीक, जलसंपदा विभाग वर्धा वर्ग ३ रा. एकविरा अपार्टमेंट फ्लॅट क्र. – एस / १०२ दुसरा माळा, शांती नगर रोड, सिंधी मेघे जि. वर्धा यांनी तक्रारदार यांचे सेवापुस्तीकेमध्ये टया दुरुस्त कराण्याकरीता व बेसिक पगारामध्ये फरक आहे तो फरक काढण्याकारीता स्वतःचे आर्थीक लाभासाठी २०,०००/- रू. लाचेची मागणी करून प्रथम हप्ता १०,०००/- रू. स्विकारण्याची तयारी दाखवुन १०,०००/- रू. आलोसे यांनी त्यांचे राहाते घरी स्विकारुन आलोसे रंगेहात मिळुन आले आहे. यावरून त्यांचे कृत्य कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ (संशोधन अधिनियम सन २०१८ ) अन्वये गुन्हा होत असल्याने त्यांचे विरूध्द पो.स्टे. रामनगर जि. वर्धा येथे कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ (संशोधन अधिनियम सन २०१८ ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात येत आहे.

सदर कार्यवाही श्री. राहुल माकणीकर, पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर, तसेच श्री. महेश चाटे, वाचक पोलीस उपअधिक्षक, लाप्रवि नागपूर, श्री. अभय आष्टेकर, पोलीस उपअधिक्षक, लाप्रवि वर्धा यांचे मार्गदर्शनात सफौ. रविद्र बावनेर, पोहवा. संतोष बावनकुळे, पोकॉ. विनोद धोगडे, प्रदिप कुचनकर, प्रशांत मानमोडे, मनापोशि स्मिता भगत सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वर्धा यांनी यशस्वीपणे कामगिरी केली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते, कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कोणी अधिकारी / कर्मचारी किंवा त्यांचे वतीने कोणी खाजगी ईसम लाचेची मागणी करीत असल्यास कृपया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये