जिवतीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- भारतीय संविधानाचे शिल्पकार, ज्ञानाचे अथांग महासागर, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिवती येथे भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि फुले–शाहू–आंबेडकर–साठे स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. पांडुरंग सावंत यांनी भूषविले. यावेळी प्रा.सावंत, उत्तम कराळे, राजेश राठोड, गोविंद टोकरे यांचेसह उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यापक कार्यभूमी, सामाजिक चळवळ आणि मानवतावादी विचारसरणीवर प्रकाश टाकत उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे (प्रचार पर्यटन) शहर उपाध्यक्ष नभिलास भगत यांनी केले. प्रास्ताविक भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष व्यंकटी कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन भारतीय बौद्ध महासभेचे शहर सरचिटणीस शरद वाटोरे यांनी मानले.
कार्यक्रमाला नगर पंचायत जिवतीचे उपाध्यक्ष जमालुद्दीन शेख, बालाजी सोनकांबळे, रवी दुर्योधन, गिरीश कांबळे, दिपक साबने, बालाजी मोरे, आकाश कोल्हेकर, प्रकाश मोरे, वैशाली वाटोरे, गिरीजा दुर्योधन, वनमाला कांबळे, भगत ताई आदी मान्यवरांसह अनेक उपासक-उपासिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



