Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा 2024-25 समारोप!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा- दिनांक 28/08/2024 ते दिनांक 31/08/2024 दरम्यान वर्धा जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा आयोज़ित करण्यात आली होती. सदर क्रीडा स्पर्धेत विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते वर्धा जिल्ह्यातील वर्धा विभाग, आर्वी विभाग, हिंगणघाट विभाग, पुलगाव विभाग व पोलीस मुख्यालय, वर्धा या संघांचा सहभाग होता. ४ दिवस चाललेल्या स्पर्धेत जिल्यातील एकूण १३० महिला व पुरुष स्पर्धकांनी भाग घेतला स्पर्धेत सांघिक स्पर्धा जसे हॉकी, फुटबॉल, बॉस्केटबॉल, कबड्डी, व्हॅलीबॉल, हॅन्डबॉल या खेळांचा सहभाग होता. मैदानी प्रकारात गोळा फेक, थाळीफेक, भालाफेक तसेच १०० मीटर २०० मीटर ८०० मीटर रनिंग स्पर्धा घेण्यात आल्या. सदर क्रीडा स्पर्धा पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांचे मार्गदर्शनात पार पडल्या समारोप समारंभ दिनांक ३१-०८-२०२४ ला सायंकाळी ४.०० वा सुरु झाला सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री संजय भारुखा जिल्हा सत्र नायाधीश वर्धा जिल्हा हे उपस्थित होते.

   प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करून विजेत्यांना बक्षीस प्रदान करण्यात आले त्यात पुरुष विभागातील बेस्ट एथेलिट चंद्रकांत वाघ, पो.मु वर्धा यांना गौरविण्यात आले, महिला विभागातील बेस्ट एथेलिट दिव्या खडसे पो.मु वर्धा यांना ट्रॉफी देवून गौरव करण्यात आला.

      ४४ व्या मास्टर राष्ट्रीय एथेलिट स्पर्धेत वर्धा पोलीस दलातील अंमलदार श्री मनीष देशमुख आणि देवेंद्र उडान यांनी महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रतिनिधित्व करून अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक पटकाउन वार्धा पोलीसांचे नाव उंचावले त्यामुळे त्यांचा पोलीस पदक आणि ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेत दयाल धवने, शुभम बहादुरे , वैष्णवी भोयर,प्रीती मोहरले या खेळाडूंनी कराटेत मेडल जिंकून वर्धा जिल्हा पोलीस दलाचे नाव उंचावले त्यांचाही मेडल आणि ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला

      दरम्यान प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत अधिकारी वर्ग यांच्यात रस्साखेच स्पर्धा आयोजित केली त्यात प्रमुख अतिथी यांचा संघ विजयी झाला, महिलांकरिता संगीत खुर्ची, लहान मुलांकरिता रनिंग स्पर्धा आयोजित करून विजेत्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमात लहान मुलांनी अतिशय उत्कृष्ट गोंडी नृत्य प्रस्तुत करून उपस्थित पाहुण्यांचे मनोरंजन केले त्यांचाही बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे शेवटी पोलीस प्रत्येक उपविभागाचे चमू चे पथ संचालन शिस्तबद्ध पद्धतीने झाले. समारोपाची सांगता उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव राहुल चव्हाण(भा.पो.से.) यांच्या भाषणाने झाली

       सदर क्रीडा स्पर्धा पोलीस अधीक्षक अनुराग जैन (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण (भा.पो.से.), पुंडलिक भटकर पोलीस उपाधीक्ष (गृह) प्रमोद मकेश्वर, श्री देवराव खंडेराव, रोषण पंडित यांचे दिशानिर्देशनात राखीव पोलीस निरीक्षक कमलाकर घोटेकर, राखीव पोलीस उपनिरीक्षक दिलीप बाणमारे गेम इन्चार्ज राजू उमरे पोलीस अंमलदार दादा दुधाने अतुल वैद्य यांनी व मुख्यालयातील इतर कर्मचारी वर्ग यांनी पार पाडली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये