Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नामुळे म्‍हाडा कॉलनी नविन चंद्रपूर येथे ५० सोलर विद्युत पोल जनतेच्‍या सेवेत

स्‍व. चांगुनाबाई मुनगंटीवार ऑटोरिक्षा म्‍हाडा वस्‍तीतील ऑटोरिक्षा चालक मालक तसेच नागरिकांनी मानले सुधीरभाऊंचे आभार

चांदा ब्लास्ट

नविन चंद्रपूर येथील स्‍व. चांगुनाबाई मुनगंटीवार ऑटोरिक्षा म्‍हाडा वस्‍तीमध्‍ये सोलर पोलची मागणी परिसरातील नागरिकांकडून वारंवार करण्‍यात येत होती. सदर विषय ऑटोरिक्षा संघटनेचे संस्‍थापक अध्‍यक्ष राजेंद्र खांडेकर तसेच जिल्‍हाध्‍यक्ष मधुकर राऊत यांनी चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री तथा राज्‍याचे वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्‍याकडे भेट देऊन  पत्रव्‍यवहार केला.

या कामाकरिता क्षणाचाही विलंब न लावता मा. सुधीरभाऊंनी उक्‍त कामाकरिता जिल्‍हा वार्षिक निधी अंतर्गत ५० सोलर पोल मंजुर करण्‍याबाबत मा. जिल्‍हाधिकारी चंद्रपूर यांना आदेशित करुन निधी उपलब्‍ध करून दिला. याकामाचे भूमीपूजन दि. ०५ सप्‍टेंबर २०२३ रोजी शिक्षक दिनाचे औचित्‍य साधून करण्‍यात आले होते. आज हे काम पूर्णत्‍वास आले असून सदर पोलवर सोलरवर आधारित दिवे लावुन नागरिकांची समस्‍या सोडविण्‍यात आली आहे.

याबाबत परिसरातील नागरिकांनी तसेच ऑटोरिक्षा संघटनेचे संस्‍थापक अध्‍यक्ष, जिल्‍हाध्‍यक्ष यांनी मा. सुधीरभाऊंचे अभिनंदन केले. सदर लोकार्पण कार्यक्रमाचे अध्‍यक्ष चंद्रपूर महानगराचे भाजपाचे अध्‍यक्ष राहूल पावडे यांच्‍या शुभ हस्‍ते करण्‍यात आले. स्‍व. चांगुनाबाई मुनगंटीवार ऑटोरिक्षा म्‍हाडा वस्‍ती दाताळा नविन चंद्रपूर येथे जनतेच्‍या सेवेकरिता सोलर पोलच्‍या प्रकाशामुळे या परिसरातील नागरिक आनंदीत झाले आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती ऑटोरिक्षा संघटना चंद्रपूरचे संस्‍थापक अध्‍यक्ष राजेंद्र खांडेकर, जिल्‍हाध्‍यक्ष मधूकर राऊत, सचिसुनिल धंदरे, संघटन प्रमुख विनोद चन्‍ने, उपाध्‍यक्ष जहीर शेख, जाकीर शेख, कुंदन रायपुरे, रवी आंबटकर, रमेश वझे, किशोर वाटेकर, विलास बावणे उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला बहुसंख्‍य नागरिकांची उपस्थिती
होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये