ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भात पिकावर मावा, तुडतुडा, पेरवा रोगाने शेतकरी हवालदिल

पीक निम्म्यावर येणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

नागभीड तहसील अंतर्गत येणाऱ्या भात पीक उत्पादन मोठया प्रमाणात होणार अशी अवस्था असताना अचानक भात पिकावर मावा, तुडतुडा आणि पेरवा नावाचा रोग दिसू लागल्याने शेतकरी प्रयन्त करून हवालदिल झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

नागभीड तालुक्यात भात पीक महत्वाचे समजले जाते. पाऊस, पाणी भात पिकासाठी योग्य समजून शेतकरी मोठा आनंदी होता मात्र पाऊस जाताच भात पिकावर रोगाने हमला करीत पेरवा, मावा तुडतुडा नावाचे रोगाने अक्षराश्या वेटिंस धरल्याचे दिसत आहे यामुळे भात पिकाचे उत्पादन १०० टक्के ऐवजी ५० टक्के एवढे येण्याची श्यक्यता आहे.

यामुळे शेतकऱ्याचा तोंडाशी आलेला घास निसर्ग निर्मित रोगाने पळवून नेल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत असल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून पीक विमा देण्यात यावा अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख बंडू पांडव यांनी एका निवेदणाद्धारे केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये