कारगिल विजय दिनानिमित्य शहीदांना अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
जय हिंद फाउंडेशन, शाखा भद्रावतीच्या वतीने शनिवारी (दि. २६) तालुका कार्यालय परिसरात कारगिल विजय दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कारगिल युद्धातील शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली तसेच अमर जवान ज्योतीला मानवंदना देऊन त्यांच्या शौर्याला अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते भास्करराव ताजने होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख मोरेश्वर विद्ये, उपसरपंच सचिन डुकरे (कढोली), सहाय्यक अभियंता लोनगाडगे, जय हिंद फाउंडेशनचे सल्लागार कॅप्टन विलास देठे, मेसको एरिया ऑफिसर सुभेदार मेजर राजेशकुमार सुंदरगिरीवार, अजित राम, म्हस्के साहेब, धम्मपाल गावंडे आदी उपस्थित होते.
यावेळी माजी सैनिक अजित राम व म्हस्के साहेब यांनी कारगिल युद्धातील प्रत्यक्ष अनुभव कथन करताना उपस्थितांना देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा व सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संदेश दिला. त्यांच्या अनुभवकथनामुळे उपस्थित वातावरण भावनांनी भारावून गेले. मान्यवरांनीही कारगिल विजय दिनाचे महत्त्व अधोरेखित करत मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवर व माजी सैनिकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी सैनिक सुरेश नाकाडे, अरुण मत्ते, नामदेव मांडवकर, महादेव कननाके, अरुण खापणे, भाऊराव मत्ते, निलेश झोडे, संदीप नागपुरे, मांडवकर ताई, दर्शना तेलरांधे, विमल मत्ते, तेजस्वी तेलरांधे, शिक्षक हुमेंद्र बोरकर, विजय पाटील, प्रवीण थेरकर, प्रेमदास तुमराम, सामाजिक कार्यकर्ते नरेश काळे, अजय टेकाम, पुरुषोत्तम नेताम, निलेश मेश्राम यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन माजी सैनिक तथा जय हिंद फाउंडेशन शाखा भद्रावतीचे अध्यक्ष विजय तेलरांधे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विजय पाटील यांनी केले. उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.



