ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयाने राबविले स्वच्छता अभियान
राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांची मोहिमेमध्ये मोलाची कामगिरी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स गडचांदूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी या मोहिमेमध्ये उत्स्फूर्त भाग घेऊन महाविद्यालयाचा परिसर तसेच आठवणी बाजाराचा परिसर स्वच्छ करून सदर मोहिमेमध्ये मोलाची कामगिरी बजावली.
स्वच्छता मोहिमेला राबविण्याकरता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव यांचे मार्गदर्शन लाभले तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप घोडिले यांनी स्वच्छता मोहीम राबविण्याकरता विशेष प्रयत्न केले. महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी स्वच्छता मोहिमेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.