ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
देऊळगाव मही येथील मोटार रिवायांडिंगचे दुकान फोडले
एकूण ७३ हजार रुपयांच्या साहित्याची चोरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
देऊळगाव मही येथील मोटार रिवायडिंगचे दुकान २ ऑक्टोबर च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
अज्ञान चोरट्यांनी ९ मोटारी (किंमत ६ हजार)तांब्याची तार (किंमत १० हजार)तसेच अन्य साहित्य असे एकूण ७३ हजार रुपयांच्या साहित्याची चोरी झाली आहेत.
दुकान मालकाने दिलेल्या तक्रारी नुसार देऊळगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली देऊळगाव मही पोलीस चौकीचे पोलिस मो,कलीम व राजू मोरे करीत आहेत.