ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘हेरिटेज वॉक’ मध्ये विद्यार्थ्यांनी जाणून घेतला चंद्रपूर शहराचा इतिहास

स्कूल हबच्या माध्यमातून एकूण आठ शाळांनी घेतला सहभाग

चांदा ब्लास्ट

जिल्हा म्हणजे ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर होय. येथील गडकिल्ल्यांचे संवर्धन करून नागरिकांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. आपल्या वारसाचे जतन हे आपणच करायला हवे. याची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात रूजवावी, तसेच जबाबदार नागरिक म्हणून या ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनाविषयीची आपली जबाबदारी स्पष्ट व्हावी याकरीता चांदा पब्लिक स्कूल तर्फे ‘कम्यूनिटी आऊटरिच प्रोगाम’ च्या अंतर्गत ‘हेरिटेज वॉक’चे आयोजन करण्यात आले. स्कूल हबच्या माध्यमातून यामध्ये एकूण आठ शाळांनी सहभाग घेतला.

चांदा पब्लिक स्कूल, श्री महर्षी विद्यामंदीर, नारायणा विद्यालयम, बजाज विद्या भवन, बी.जे.एम. कारमेल अकादमी, ए.बी.पी.एस. गडचांदूर, सेंट ऐनिस व संस्कार भारती वरोरा या शाळेतील विद्यार्थी हेरिटेज वॉक मध्ये सामील झाले.
‘हेरिटेज वॉक’ ची सुरूवात चांदा पब्लिक स्कूल येथुन बुधवारी सकाळी ९ वाजता करण्यात आली. बगड खिडकी, पठाणपूरा गेट, अपुर्णा देवालय, अंचलेश्वर गेट या मार्गाने विद्यार्थ्यांनी ‘हेरिटेज वॉक’ चा उपक्रम पूर्ण केला व स्वच्छता मोहीमे सोबतच ऐतिहासिक गौरवशाली वास्तुंना जोपासण्याचा संकल्प याप्रसंगी विद्यार्थ्यांनी केला.

यादरम्यान अंचलेश्वर गेट येथे इको-प्रोचे संस्थापक अध्यक्ष बंडू धोतरे यांनी ऐतिहासिक वारसा लाभलेल्या चंद्रपूरच्या राणी हिराईचा गौरवशाली इतिहास सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे यांनी ‘हेरिटेज वॉक’ उपक्रमात सहभागी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. ‘हेरिटेज वॉक सारख्या उपक्रमातून ऐतिहासिक वारसा संवर्धन होईल’, असे मत त्यांनी व्यक्त केले. प्राचार्या आम्रपाली पडोळे यांनी ‘हेरिटेज वॉक’ उपक्रमाचा शुभारंभ करून उपस्थित सर्वांचे स्वागत केले. तसेच अशा उत्साहवर्धक उपक्रमाला सहकार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या पालकांचे आभार मानले. यावेळी सहभागी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रम प्रमुख फहीम शेख, पर्यवेक्षक महेश गौरकार, प्रणोती चौधरी व विद्यार्थी मंत्रीमंडळातील सदस्यांनी आपल्या सहकार्याने ‘हेरिटेज वॉक’ उपक्रमाला यशस्वी बनवले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये