भद्रावती नगरपरिषद क्षेत्रात आमदारांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पन सोहळा उद्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
नगरपरिषद भद्रावती क्षेत्रात विविध कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उद्या बुधवार ला घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार प्रतिभा धानोरकर कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल धानोरकर उपस्थित राहणार आहे.
भद्रावती नगर परिषद क्षेत्रात अध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या कार्यकाळामध्ये बऱ्याच विकासात्मक योजना कार्यान्वित करण्यात आल्या त्यात भद्रावती कराना २४ तास पाणी उपलब्ध होण्याकरिता ५२.८७ कोटी खर्च करून वाढीव पाणीपुरवठा योजना, एकता नगर ते हनुमान मंदिर ते विजासन डांबरीकरण करणे अग्निशामक कर्मचाऱ्यांकरिता १.४३ कोटी खर्च करून निवासी इमारतीचे बांधकाम, २३ लाखाचे पुरातन वास्तु संग्रहालय, ९५ लाखाचे अग्निशामक वाहन खरेदी इत्यादी कामाचे लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम उद्घाटन उद्याला तीन वाजता करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला नगरपरिषद उपाध्यक्ष संतोष आमने, विनोद वानखेडे, प्रतिभा सोनटक्के, चंद्रकांत खारकर, निलेश पाटील, अनिता मुळे आधी उपस्थित राहणार आहे.