ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एका शिक्षकांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपी फरार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत गेडाम

 नागभीड तालुक्यातील तळोधी बा. अंतर्गत येत असलेल्या सावरगाव येथील एका शिक्षकाने १० वर्षीय मुलीची छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडितेसह आई-वडिलांच्या तक्रारीवरून त्या शिक्षकाविरुद्ध भादंवि ३५४ अ, भादंवि सहकलम ८,१० पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पसार आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत.

तपास तळोधी बा. ठाणेदार मंगेश भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भास्कर पिसे करीत आहेत. त्या शिक्षकाला निलंबित करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये