ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घुसमध्ये भारताचे ‘मिसाईल मॅन’ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

चंद्रपूर :_

घुग्घुस, चंद्रपूर : भारताचे 11 वे माजी राष्ट्रपती, महान वैज्ञानिक आणि ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त घुग्घुस शहर काँग्रेस कार्यालयात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वात कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी अध्यक्ष राजुरेड्डी यांनी कलाम साहेबांच्या कार्याचा उल्लेख करताना सांगितले की, “डॉ. कलाम यांनी भारताच्या संरक्षण व अंतराळ क्षेत्रात अत्यंत महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी DRDO आणि ISRO या संस्थांमध्ये कार्य करत भारताला मिसाईल तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भर बनवले.”

कार्यक्रमास काँग्रेस नेते सैय्यद अनवर, जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, तालुका सचिव विशाल मादर, सुनील पाटील, निखिल पुनघंटी, कुमार रुद्रारप, दिपक कांबळे, कपिल गोगला, आयुष आवळे, अंकुश सपाटे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान कलाम यांच्या विचारांना उजाळा देत उपस्थितांनी देशसेवेसाठी प्रेरणा घेण्याचा संकल्प केला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये