घुग्घुसमध्ये लाडकी बहीण समितीच्या महिलांसमवेत महाआरोग्य शिबिराच्या नियोजनासाठी बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट
घुग्घुस, चंद्रपूर : येथील मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात लाडकी बहीण समितीच्या महिलांची भव्य महाआरोग्य शिबिराच्या नियोजनासाठी बैठक शनिवार, २६ जुलै रोजी पार पडली.
विकासपुरुष, लोकनेते मा. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घुसचे भूमिपुत्र व राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या नेतृत्वात हे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिर ३० जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रयास सभागृह, घुग्घुस येथे पार पडणार आहे.
बैठकीदरम्यान भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शिबिराच्या नियोजनासंबंधी मार्गदर्शन केले. तसेच, “या शिबिराचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या बैठकीला भाजपाचे निरीक्षक तांड्रा, अमोल थेरे, चिन्नाजी नलभोगा, सिनू इसारप, महेश लठ्ठा, गणेश कुटेमाटे, सुनील बाम, प्रमोद भोस्कर, बबलू सातपुते, रत्नेश सिंग, इर्शाद कुरेशी, तुलसीदास ढवस, मिलिंद पानघाटे, हसन शेख, सतीश बोन्डे, सुरेंद्र भोंगळे, हेमंत पाझारे, श्रीकांत सावे, सुरेंद्र जोगी, योगेश घोडके, योगेश होकम, सुशील डांगे, गंधर्व भगत, ललित होकम, शंकर सिद्दम, गोपाल तोटा, अनंता कापरे, प्रवेश सोदारी, भारत साळवे, अतुल चोखांद्रे, विक्की निभ्रड, गणेश राजुरकर, विक्की सारसर, अनुपम जोगी, रवी चुने, गौरव ठाकरे, सुनील राम, विनोद जंजर्ला, शुभ सोदारी, सिनू कोत्तूर, राकेश चिंताला, रोहित जैस्वाल, अमीना बेगम यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
हे महाआरोग्य शिबिर स्थानिक जनतेसाठी एक उपयुक्त संधी ठरणार असून विविध आरोग्य तपासण्या आणि वैद्यकीय सल्ल्याचा लाभ नागरिकांना मिळणार आहे.