Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रह्मपुरी एस.टी.आगारात बसेसची कमतरता जुन्याच भंगार बस गाड्यांमधून प्रवाशांना करावा लागतो प्रवास

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार लक्ष देतील का?

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ गडचिरोली विभाग अंतर्गत येत असलेल्या ब्रम्हपुरी आगरामध्ये अपुऱ्या व जुन्याच भंगार गाड्यावर आगाराचा डोलारा उभा आहे. या आगारातील बऱ्याच बसेस या जुन्या झाल्या असून त्या भंगारात काढण्याच्या योग्यतेच्या आहेत अशा बसेसचा वापर प्रवासी फेऱ्यांकरिता वापरात आणली जात आहेत.

अशा बसेसमध्ये प्रवासाच्या वेळी रस्त्यावर बिघडण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या आगाराला नवीन बसेस ची आवश्यकता आहे. नवीन बसेस मिळण्याबाबत शासन दरबारी, लोकप्रतिनिधी यांचेकडे या पूर्वी सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे. महामंडळाच्या मुख्य कार्यालयाने प्रथम प्राधान्याने ब्रम्हपुरी आगराला बस उपलब्ध करून देण्यात येईल असे पत्राद्वारे कळविले आहे. परंतु ब्रह्मपुरी आगाराला एकही नवीन बस उपलब्ध झाली नाही. मात्र आपल्याच जिल्ह्यातील इतर आगराला 10-10 नवीन बस उपलब्ध झाल्या परंतु ब्रम्हपुरी आगार या मध्ये उपेक्षित राहिला आहे . महामंडळाने महिला व जेष्ठ नगरिकाकरीता सवलत जाहीर केल्याने प्रवासी संख्येत वाढ झाली व आगारांचे उत्पन्न वाढले परंतु जुन्या व अपुऱ्या बसेस मुळे प्रवाशांना सेवा देण्यास ब्रम्हपुरी Ooltah तारेवरची कसरत करावी लागत आहे.

सदर जनतेची मागणी लक्षात घेऊन आतातरी नवीन बसेस उपलब्ध होईल काय. या मागणी कडे लोकप्रतिनिधी लक्ष देऊन ब्रम्हपुरी आगरला नवीन बसेस मिळवून देतील अशी ब्रम्हपुरी व परिसरातील नागरिकाची आशा आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये