ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बल्लारपूर पेपर मिलमध्ये बुद्ध जयंती थाटात साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

मागील अनेक वर्षापासून बल्लारपूर पेपर मिल कला मंदिर येथे बुद्ध पौर्णिमा उत्सव समितीद्वारे बुद्ध जयंती निमित्त प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते . दिनांक 23 मे 2024 ला सायंकाळी सात वाजता या समितीद्वारे बुद्ध जयंती निमित्त खूप सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

पेपर मिल कला मंदिरच्या भव्य रंगमंचावर कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी उद्घाटन प्राध्यापक डॉक्टर सुभाष खंडारे वर्धा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळेस कार्यक्रमाला संबोधन करताना प्राध्यापक खंडारे यांनी म्हटलं की बुद्ध धर्म हा जगातील सर्वात श्रेष्ठ धर्म आहे तसेच बुद्ध धर्म आणि बुद्धकालीन इतिहासावर त्यांनी प्रकाश टाकला कार्यक्रमाचे प्रास्ताविक रितेश बोरकर यांनी केले त्याचप्रमाणे अध्यक्षीय भाषण समितीचे अध्यक्ष विश्वास देशभ्रतार यांनी केले. उत्कृष्ट आवाजाचे धनी श्रीनिवास मा मासे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. उत्कृष्ट प्रबोधनकार व गायक भूपेश सवाई नागपूर यांनी आपल्या संचासह बुद्ध भीम गीत सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

त्यावेळी बल्लारपूर पेपर मिल मजदूर युनियनचे महासचिव वसंत जी मांढरे यांची उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमाला एक आकर्षण देण्याकरिता भीमशक्ती फाउंडेशन आणि सह्याद्री ढोल ताशा पथक यांच्याद्वारे संपूर्ण श्रोत्यांना व उपस्थित त्यांना आमरसचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बुद्ध पौर्णिमा समितीचे अध्यक्ष विश्वास देशभ्रतार,सचिव आकाशकांत दुर्गे, उपाध्यक्ष आनंद वाळके, सहसचिव निशांत सुटे, कोषाध्यक्ष मुकेश अलोने, संघटक नीलकंठ पाटील,अनुज शेंडे,महेंद्र रामटेके,व त्यासोबत प्रसिद्धी प्रमुख मंगलदीप हस्ते व सुमित शेंडे तसेच इतर कार्यकर्ते व सदस्यांच्या अथक परिश्रमाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला संपूर्ण कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पवन मेश्राम यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये