सुनिल हटवार सर, जि.प.उ.प्राथ. शाळा पारडी (ठवरे) पं.स. नागभिड यांना चंद्रपूर जिल्हा परिषदेचा जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे
महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्रातील शिक्षकांना तंत्रस्नेही बनविण्यासाठी धडपडत असून श्री.सुनिल हटवार सर या समूहाचे राज्यसमन्वयक आहेत.
जि.प उच्च प्राथ,शाळा पारडी [ठवरे] येथे विविध उपक्रम राबवित असून तंत्रस्नेही समूहाच्या माध्यमातून शिक्षणाची दहा गाभाभूत घटकांपैकी एक असलेल्या “भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास” अंतर्गत “आझादी का अमृत महोत्सव” सदरा द्वारे भारतातील क्रांतिकारक व स्वातंत्र्य सैनिकांच्या जिवनकार्याचा परिचय करुन देणारी लेखमालिका त्यांच्या जयंती व पुण्यतीथीच्या दिवशी प्रसारीत केली जात आहे. आजपर्यंत जवळपास 625 क्रांतिकारक व स्वातंत्र्य सैनिकांची माहीती प्रसारीत करण्यात आलेली असून महाराष्ट्रातील ब-याच शाळा व महाविद्यालयांमध्ये परिपाठात या लेखमालेचे नियमित वाचन केल्या जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रप्रेम, देशभक्ती इत्यादी मूल्ये रुजविण्यास मदत होत आहे.
ही लेखमालिका देशभरात पोहोचत तर आहेच पण विदेशातील महाराष्ट्रीयन लोकांपर्यंत सुध्दा पोहोचत आहे. श्री. सुनिल हटवार सर तंत्रस्नेही व उपक्रमशील शिक्षक म्हणून जिल्ह्यात परिचित व्यक्तीमत्व आहेत. अशा उपक्रमशील, तंत्रस्नेही व विद्यार्थीनिष्ठ शिक्षकांचा सन्मान होत असतांना शैक्षणिक सेवेतील ज्ञाननिष्ठा, कर्तव्यनिष्ठा, सामाजिकदृष्टीता व विद्यार्थीभिमूख आपल्या कार्याचा शिक्षक दिनी होत असलेला जिल्हा शिक्षक पुरस्कार सन्मान निश्चितपणे सर्वांगीण समाज आणि मित्रपरिवारजणांस सुखदायी,आनंददायी ठरलेला आहेच.
जिल्हा शिक्षक पूरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल पंचायत समिती नागभिडचे संवर्ग विकास अधिकारी मान. खोचरे मॕडम, गटशिक्षणाधिकारी मान. पालवे साहेब, केंद्र प्रमुख मान. मोटघरे सर, मुख्याध्यापक मान. शेंडे सर व सर्व सहकारी शिक्षक वृंद तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मान. युवराज ठवरे व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले.