ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चिरीमरीसाठी सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्यांची गय नाही – विरोधी पक्षनेते वडेट्टीवार

सिंदेवाही पं. स. च्या आढावासभेत अधिकाऱ्यांची कानउघाडणी

चांदा ब्लास्ट

ग्रामखेड्यांच्या विकासाची परिपूर्ण जबाबदारी ही पंचायत समितीच्या खांद्यावर असते. अशातच प्रशासन व जनता यातील दुवा म्हणून काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांनी किरकोळ कामे घेऊन येणाऱ्या सर्वसामान्य जनतेला चिरीमिरीसाठी वेठीस धरून त्यांची कामे अडवून धरल्यास अश्या भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. अशी तंबी देत राज्याचे विरोधी पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार सिंदेवाही पंचायत समितीच्या आमसभेत अधिकाऱ्यांना चांगल्याच कानपीचक्या घेतल्या. सिंदेवाही येथे आयोजित  प. स. च्या आढावा सभेत अध्यक्ष म्हणून बोलत होते.
आयोजित आढावा सभेस प्रमुख अतिथी म्हणून सिंदेवाही तहसीलदार शुभम बहाकर, गटविकास अधिकारी अक्षय सुकरे, काँग्रेस जिल्हा महासचिव हरिभाऊ बारेकर,सिंदेवाही कॉग्रेस तालुका अध्यक्ष रमाकांत लोधे, शहराध्यक्ष सुनील उट्टलवार, सिंदेवाही – लोनवाही नगरपंचायत अध्यक्ष स्वप्निल कावळे, माजी प. स. सदस्य राहुल पोरेड्डीवार, तथा सर्व विभागाचे अधिकारी, तालुक्यातील सरपंच, उपसरपंच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व तालुक्यातील विविध ग्राम खेड्यातील सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते.
पंचायत समितीचा आढावा घेताना मनरेगा अंतर्गत मंजूर पांदण रस्ते, जि प शाळांना संरक्षण भिंत, गुरांचे गोठे,घरकुल योजना मार्फत लाभार्थ्यांच्या कामांची प्रगती देण्यात आलेली देयके , जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा विभागाच्या कामाची प्रगतीनिहाय माहिती, बांधकाम विभाग , शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन, तसेच तालुक्यातील ग्रामपंचायत मधील विकास कामांच्या माहितीचा कसून आढावा यावेळी राज्याचे विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी घेतला. यावेळी उपस्थित सरपंच व ग्रामस्थ यांनी मनरेगा व  घरकुल विभाग यांचे चिरीमिरी साठी देयके अडवणूक धोरण लक्षात आणून देताच सभा अध्यक्ष तथा विरोधी पक्षनेते आ .विजय वडेट्टीवार यांनी दोन्ही विभागाचा चांगलाच खरपूस समाचार घेत चिरीमिरी साठी कुठल्याही विभागाच्या अधिकाऱ्याने जर सर्वसामान्य जनतेस वेठीस धरण्याची यापुढे तक्रार प्राप्त झाल्यास  त्या अधिकारी किंवा कर्मचारी यांची गय केल्या जाणार नाही अशी स्पष्ट तंबी दिली. सोबतच सरपंच म्हणजे गावाचा प्रथम नागरिक गाव विकासासोबतच अन्य वैयक्तिक योजनांचाही लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यास पुढाकार सरपंचांनी घ्यावा असे आवाहन ही त्यांनी उपस्थित सरपंच यांना करूनग्रामखेड्यांच्या विकासाची परिपूर्ण जबाबदारी ही पंचायत समितीच्या खांद्यावर असते. अशातच प्रशासन व जनता यातील दुवा म्हणून काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांनी किरकोळ कामे घेऊन येणाऱ्या सर्वसामान्य जनतेला चिरीमिरीसाठी वेठीस धरून त्यांची कामे अडवून धरल्यास अश्या भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. अशी तंबी देत राज्याचे विरोधी पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार सिंदेवाही पंचायत समितीच्या आमसभेत अधिकाऱ्यांना चांगल्याच कानपीचक्या घेतल्या. सिंदेवाही येथे आयोजित प. स. च्या आढावा सभेत अध्यक्ष म्हणून बोलत होते.

आयोजित आढावा सभेस प्रमुख अतिथी म्हणून सिंदेवाही तहसीलदार शुभम बहाकर, गटविकास अधिकारी अक्षय सुकरे, काँग्रेस जिल्हा महासचिव हरिभाऊ बारेकर,सिंदेवाही कॉग्रेस तालुका अध्यक्ष रमाकांत लोधे, शहराध्यक्ष सुनील उट्टलवार, सिंदेवाही – लोनवाही नगरपंचायत अध्यक्ष स्वप्निल कावळे, माजी प. स. सदस्य राहुल पोरेड्डीवार, तथा सर्व विभागाचे अधिकारी, तालुक्यातील सरपंच, उपसरपंच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व तालुक्यातील विविध ग्राम खेड्यातील सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते.
पंचायत समितीचा आढावा घेताना मनरेगा अंतर्गत मंजूर पांदण रस्ते, जि प शाळांना संरक्षण भिंत, गुरांचे गोठे,घरकुल योजना मार्फत लाभार्थ्यांच्या कामांची प्रगती देण्यात आलेली देयके, जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा विभागाच्या कामाची प्रगतीनिहाय माहिती, बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन, तसेच तालुक्यातील ग्रामपंचायत मधील विकास कामांच्या माहितीचा कसून आढावा यावेळी राज्याचे विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी घेतला. यावेळी उपस्थित सरपंच व ग्रामस्थ यांनी मनरेगा व घरकुल विभाग यांचे चिरीमिरी साठी देयके अडवणूक धोरण लक्षात आणून देताच सभा अध्यक्ष तथा विरोधी पक्षनेते आ .विजय वडेट्टीवार यांनी दोन्ही विभागाचा चांगलाच खरपूस समाचार घेत चिरीमिरी साठी कुठल्याही विभागाच्या अधिकाऱ्याने जर सर्वसामान्य जनतेस वेठीस धरण्याची यापुढे तक्रार प्राप्त झाल्यास त्या अधिकारी किंवा कर्मचारी यांची गय केल्या जाणार नाही अशी स्पष्ट तंबी दिली. सोबतच सरपंच म्हणजे गावाचा प्रथम नागरिक गाव विकासासोबतच अन्य वैयक्तिक योजनांचाही लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यास पुढाकार सरपंचांनी घ्यावा असे आवाहन ही त्यांनी उपस्थित सरपंच यांना करून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निर्देश दिले. तत्वतः शासन स्तरावरून ज्या जनकल्याणकारी योजना राबविल्या जातात या योजना पारदर्शक रित्या राबवून योग्य लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्याचे काम अधिकाऱ्यांनी करावे असे निर्देश राज्याचे विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित पंचायत समितीच्या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निर्देश दिले. तत्वतः शासन स्तरावरून ज्या जनकल्याणकारी योजना राबविल्या जातात या योजना पारदर्शक रित्या राबवून योग्य लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्याचे काम अधिकाऱ्यांनी करावे असे निर्देश राज्याचे विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित पंचायत समितीच्या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये