Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रांजली मारगोनवार हिला पोषक थाळी स्पर्धेत प्रथम पुरस्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गड़चांदुर शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालीत, महात्मा गाँधी कॉलेज ऑफ़ सायन्स गड़चांदुर येथील बीएससी-३ च्या प्रांजली मारगोनवार ह्या विद्यार्थिनीला आय.टी.आय, सेडी, अम्बुजा सीमेंट, गड़चांदुर द्वारे आयोजित “पोषक थाळी आहार” या स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.

दिनांक १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर हा कालावधी पोषण सप्ताह (nutrition week) तसेच संपूर्ण सप्टेंबर महीना पोषण महीना (nutrition month) म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने अम्बुजा सीमेंट फाउंडेशनद्वारा संचालित कौशल्य तथा उद्योजक विकास संस्था (SEDI) द्वारे या विषयवार दिनांक १३ सप्टेंबर २०२३ रोजी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा घेण्यात आली होती.

प्रांजली हिने पोषक थाळी स्पर्धेत जास्तीत जास्त पोषणमूल्ये असलेली खाद्यपदार्थाची थाळी बनवून त्याची प्रस्तुती केली. तिने ब्लैक राइस खीर, केळ बर्फी, बीटरूट पोळी, नाचनी भाकरी, काटवल, सोयाबीन भाजी, पनीर भुर्जी, एल्कलाइन पानी, मोहफुल लाडू, मशरुम सूप, मक्का कन्या अशी व्यंजने आपल्या पोषक थाळीत प्रस्तुत केली.

प्रजाली हिने आपले यशाचे श्रेय कॉलेजचे प्राचार्य डॉ. शैलेन्द्र देव, डॉ. उत्कर्ष मून व आपल्या पाल्यांना दिले आहे. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तिच्या यशाबद्दल तिचे कौतुक करत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये