ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कवी कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय वर्धापन दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती येथे डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय महाविद्यालय भद्रावतीमध्ये कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यापीठ वर्धापन दिन आनंदात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विश्वविद्यापीठाचा ध्वजारोहण करण्यात आला व राष्ट्रगीत सादर करण्यात आले. सदर कार्यक्रमाची संकल्पना संस्थेचे सचिव डॉ. कार्तिक शिंदे यांच्या मार्गदर्शनात पार पडली. कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने करण्यात आली आली असून कवी कालिदास यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमावेळी प्रमूख पाहुणे म्हणून प्रा. प्रज्ञा बुरडकर, प्रा. प्रीती कंदीकट्टीवार असून अध्यक्षीय ठिकाणी डॉ. प्रशांत पाठक होते. प्रा. प्रज्ञा बुरडकर यांनी प्रास्ताविकेतुन कवी कालिदास यांच्या आत्मचरित्रावर प्रकाश टाकला. प्रा. प्रीती कनकट्टीवार यांनी कालिदासाचे जीवनकार्यावर विद्यार्थांना मार्गदर्शन केले असून अध्यक्षीय भाषणातून डॉ. प्रशांत पाठक यांनी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यापिठाचे महत्व विद्यार्थांच्या लक्षात आणुन दिले व कवी कालिदास यांच्या जीवनकार्यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.ए. प्रथम वर्षाची विद्यार्थिनी दामिनी परचाके हिने केले व आभार प्रा. नेहा मानकर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद पाठक, प्रा. कपिल राऊत, प्रा. विशाल प्रसाद, शिक्षकेत्तर कर्मचारी व असंख्य विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये