ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बँकेच्या मनमानी कारभारा विरोधात आंदोलनाचा इशारा

शेतकरी संघटना व विराआस मार्फत तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- शेतीच्या खरिप हंगामाकरिता शेतकऱ्यांना तात्काळ बँकेने पिक कर्ज मंजूर करावे असे शासनाचे आदेश असले तरी तालुक्यातील एकमेव असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या शाखा अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे अजूनही बहूतांश शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळाले नाही. याबाबत अनेकदा विचारना करूनही पिक कर्ज देण्यास संबंधित बँक टाळाटाळ करित असल्याने विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत जिवती तहसीलदारांना निवेदनही दिले आहे.

अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती असून कोरडवाहू शेतीवरच आपल्या संसाराचा गाडा चालवावा लागतो,कोरडवाहू शेतीच्या खरिप हंगामासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो,बि-बियानांच्या लागवडी पासून तर पिक हातात येईपर्यंत शेतकऱ्यांना अतोनात खर्च करावा लागतो जवळ असलेले पैसे आतापर्यंत शेतीत गुंतवले आता बँकेकडून पिक कर्ज मिळेल या आशेने संपूर्ण कागदपञे देऊन नुसते हेलपाटे मारावे लागत आहे. कर्ज तर सोडाच बँकेच्या अधिकाऱ्यांकडून वागणूकही बरोबर मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. बँकेच्या वतीने पीक कर्जाची फाईल तहसील कार्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात येते,तहसील कार्यालयातून तपासणी झाल्यानंतर परत बँकेला पाठविण्यात येते परंतु बँकेचे शाखा व्यवस्थापक पीक कर्जाची फाईल तपासणी करण्याऱ्या अधिकारी ला चॅलेंज करत आहेत कर्जासाठी दिलेले कागदपत्रे बोगस आहेत.एका प्रकारे ते महसूल विभागाला आवाहन देत आहेत.ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरले नाही त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याला बँकेकडून होल्ड लावण्यात आले आहेत.

होल्ड लावण्यात आलेल्या खात्यावर पीएम किसान योजना,संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग योजना, घरकुल योजना अश्या अनेक योजनेचा निधी जमा होत असून खात्यावर होल्ड लावण्यात आल्यामुळे खात्यातून रक्कम काढता येत नाही, आणि इतरही आर्थिक व्यवहार करता येत नसल्याने ११ सप्टेंबर ला तहसीलदार जिवती व शाखा व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक पाटण यांना शेतकरी संघटना तसेच विदर्भ राज्य आंदोलन समिती जिवतीच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे की शेतकऱ्यांना तत्काळ पीककर्ज मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करावी, आणि बँक खात्यावरील होल्ड तात्काळ हटविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे, वरील मागण्या तत्काळ पूर्ण न झाल्यास १८ सप्टेंबर ला दुपारी १२ वाजता बँकेच्या समोर अर्धनग्न आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदन देताना सय्यद शब्बीर जागीरदार शेतकरी संघटना तालुकाप्रमुख, नरसिंग हामणे उपसरपंच ग्रामपंचायत शेणगाव, विनोद पवार तालुका उपाध्यक्ष, रामेश्वर नामपल्ले युवा आघाडी तालुकाध्यक्ष, लक्ष्मण पवार युवा आघाडी तालुकासचिव, सुदाम राठोड विदर्भ राज्य आंदोलन समिती व इतर पदाधिकारी उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये