ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मकरसंक्रांतीनिमित्त शंकर पट स्पर्धेचे आयोजन

राजराजेश्वर पट कमिटी, पोंभुर्णा यांचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

मकरसंक्रांतीच्या पावन पर्वानिमित्त येथील राजराजेश्वर पट कमिटी, पोंभुर्णा यांच्या वतीने आयोजित शंकर पट स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा आज मोठ्या उत्साहात व पारंपरिक वातावरणात पार पडला. या स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक गणेश वासलवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आनंदराव पातळे, वनरक्षक देवराव टेकाम, तसेच दासूजी देवताळे, नल्लूजी गुरनुले, आनंदराव मोगरकर व मोहन चलाख यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमास पट कमिटीचे अध्यक्ष भुजंग ढोले, सचिव जगणं कोहळे, तसेच सदस्य करण देवताळे, देविदास गव्हारे, सदाशिव देवताळे यांच्यासह संपूर्ण पट कमिटी उपस्थित होती.

उद्घाटनप्रसंगी नगरसेवक गणेश वासलवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “मकरसंक्रांतीसारख्या सणानिमित्त शंकर पटसारखे पारंपरिक खेळ आयोजित करणे ही आपली संस्कृती जपण्याची परंपरा आहे. अशा स्पर्धांमधून युवकांमध्ये शिस्त, ताकद, संयम आणि एकोप्याची भावना निर्माण होते. राजराजेश्वर पट कमिटीने घेतलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.”

दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी पटप्रेमी नागरिक, ग्रामस्थ व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण कार्यक्रम शांततेत, शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये