ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पहिले राज्यस्तरीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन 18 फेब्रुला नागपुरात

अनेक साहितिकाची उपस्थिती ; विशेष मान्यवरांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

     येत्या 18 फेब्रू 2024 रोजी नागपूर येथील टिळक पत्रकार भवन बर्डी नागपूर येथे पहिले राज्यस्तरीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन भारतीय मुस्लिम परिषदे ने आयोजित केले असून यात राज्यातील अनेक साहितिक हजर राहणार आहे.यात वर्तमान राजकीय स्थिती व साहीतिकाची जबाबदारी यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. हे व्यासपीठ आपले समतेचे हक्काचे व्यासपीठ आहे.

मुस्लिम मराठी साहित्य संमेलन साहित्य प्रवाह माणसाचे गीत गाणारे आहे. म्हणून फुले शाहू आंबेडकरी साहित्य प्रवाहाचाबंधू प्रवाह आहे. मुस्लिमांनी मी महाराष्ट्रीयन म्हणून चालणार नाही.या मातीच्या समता वादी घडविण्यात आपले सर्वाचे योगदान नाकारणाऱ्या दहशतवादी साहित्य प्रवाहात सकारात्मक उत्तर देणे गरजेचे आहे. या समेलनाला विशेष आमंत्रक,आयोजक,भारतीय मुस्लिम परिषदेचे प्रा. जावेद पाशा, प्रा.रमेश पिसे, प्रा. असलम बारी, डॉ. वहीद पटेल, हाजी नासीर साहेब,ताहेरा शेख, डॉ.ममता मुन, डॉ.एस,एस.पठाण., ऍड.अकील अकतर,सुरेश मुन,किसंदादा हटवार,अरुणकुमार नवबाउद्ध, प्रा. सरताज शेख, वहीद खान,फिरोज अहमद,मिर्झा वहाब बेग, हफीजुररहमान खान, अबिद कुरेशी,नईम अजीज,मोहसीन शेख, टोफिक पटेल,मुस्ताक अली,सुहेल शेख,जिया कुरेशी,फिरोज अहमद,हाजी परवेझ खान,सुरेश मुन, सह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहे, पुरस्कार वितरण झाल्यानंतर राष्ट्रगीताने संमेलन ची सांगता होईल.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये