ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोल पुलाचे काम त्वरित करावे

अन्यथा रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा - चेतन गेडाम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

बल्लारपूर :- बल्लारपूर शहर दोन विभागात असून वस्ती विभाग ला जोडणारा गोल पुल आपली महत्वाची भूमिका बजावते. नुकतेच रेल्वे विभागाकडून नवीन लाईन टाकण्याचे काम केले. त्यात गोल पुलाला वाढवून त्याच्या वर रेल्वे लाईन टाकण्यात आले होते.

ते काम होत असताना १५ – २० दिवस वस्ती विभागाचे संपर्क तुटले होते. त्यातच आता गोल पुलामध्ये खड्डे झाले असून थोडे ही पाऊस आला तर पाणी साचून राहते. त्यामुळे ये जा करणाऱ्या नागरिकांना तसेच वाहन चालविणाऱ्या कसरत करावी लागते. आता पुढील महिन्यात पावसाळा सुरू होण्यापूर्वी गोल पुलाचे बांधकाम पूर्ण करावे अन्यथा युवक काँग्रेस तर्फे रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे सचिव चेतन गेडाम यांनी रेल्वे अधिकारी ला निवेदन देऊन केले आहे.

       या वेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे सचिव चेतन गेडाम, अरविंद वर्मा, सुनील मोतीलाल, गोपाल कलवला, राहुल पाल, रोहित खान, रोशन ढेंगळे, बंटी पुसला उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये